Join us  

'डॉन ३' मधील खलनायकाच्या भूमिकेबद्दल इम्रान हाश्मीने केला खुलासा, इंस्टाग्राम पोस्ट व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 1:18 PM

बॉलिवूडमधील सिरियल किसर म्हणून ओळख असणारा अभिनेता इम्रान हाश्मी हा डॉन-३ मध्ये खलनायकाची भूमिका साकारेल अशा जोरदार चर्चा रंगल्या होत्या.

'Don 3' Update : बॉलिवूड अभिनेता इम्रान हाश्मी एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलाय. फरहान अख्तर दिग्दर्शित डॉन-३ या चित्रपटाची घोषणा २०२३ मध्येच करण्यात आली होती. अभिनेता रणवीर सिंह तसेच किआरा अडवाणी मुख्य भूमिकेत असल्यामुळे या चित्रपटाबद्दल वाऱ्यासारख्या चर्चा पसरु लागल्या. 

इंडस्ट्रीतील सिरियल किसर म्हणून ओळख असणारा अभिनेता इम्रान हाश्मी हा डॉन-३ मध्ये खलनायकाची भूमिका साकारेल अशा जोरदार चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता त्यावर खुद्द इम्रान हाश्मीने भाष्य केलं आहे. या चर्चांना त्याने अखेरीस पूर्णविराम दिला आहे. 

दरम्यान, नुकतीच अभिनेत्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवरून याबाबत चाहत्यांना माहिती दिली आहे. आपण डॉन-३ या चित्रपटात काम करणार नसल्याचा खुलसा त्याने या पोस्टमधून केलाय. "काही चाहते तसेच पत्रकार मला वारंवार या चित्रपटासंदर्भात प्रश्न विचारत आहेत, मी डॉन-३ या सिनेमाचा भाग नव्हतोच. शिवाय या चित्रपटासाठी मला कधीही विचारणा झाली नाही." अशी माहिती इम्रानने दिली. 

बॉलिवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा टायगर-३ चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरडुपर हिट ठरला. टायगर-३ या चित्रपटात इम्रान हाश्मी हा सलमानला टक्कर देताना दिसला. त्याने आयएसआय एजंट आतिश फतेह कादरीची भूमिका साकारली. त्यामुळे  डॉन-३ मध्येही इम्रान झळकणार असल्याच्या केवळ अफवा होत्या हे आता स्पष्ट झालंय. 

टॅग्स :इमरान हाश्मीकियारा अडवाणीरणवीर सिंग