Join us  

जाळीदार ब्रा अन् सिक्स पॅक अ‍ॅब्स, जॅकी श्रॉफच्या लेकीचं बोल्ड फोटोशूट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2021 1:53 PM

अभिनेता जॅकी श्रॉफची लेक कृष्णा श्रॉफने भलेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी ती सातत्याने चर्चेत येत असते.

बॉलिवूडचा जग्गू दादा म्हणजेच अभिनेता जॅकी श्रॉफची लेक कृष्णा श्रॉफने भलेही बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नसले तरी ती सातत्याने चर्चेत येत असते. इतकेच नाही तर तिचा फॅन फॉलोव्हिंग खूप आहे. विशेष बाब म्हणजे ती तिच्या फिटनेसने सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. तसेच सोशल मीडियावर ती अ‍ॅक्टिव्ह असून बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर करत असते आणि त्यामुळे ती चर्चेत येत असते. आता ती पुन्हा एकदा बोल्ड फोटोमुळे चर्चेत आली आहे. 

कृष्णा श्रॉफने नुकताच इंस्टाग्रामवर शॉर्ट पँट आणि ब्लॅक ब्रा मधील फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये तिचे फिट शरीर आणि सिक्स पॅक अ‍ॅब्स ही दिसत आहेत.

दुसऱ्या एका पोस्टमध्ये तिने स्पोर्टस गिअरमध्ये बसून फोटो काढले आहेत. ब्लॅक शॉर्ट आणि जाळीदार जॅकेटसह तिने हे फोटोशूट केले आहे.

दरम्यान, जवळपास ९ लाख ६० हजार फॉलोअर्स असणाऱ्या कृष्णा श्रॉफ हिने टॉपलेस फोटोशूट करून खळबळ उडवली होती. तसेच ती भाऊ टायगर श्रॉफ प्रमाणे फिटनेस फ्रिक आहे. बऱ्याचदा ती वर्कआउट करतानाचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. 

कृष्णा श्रॉफ टायगर प्रमाणे बॉलिवूडमध्ये एन्ट्री कधी करणार, हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. मात्र बहुतेक ती पडद्यामागे राहणे पसंत करते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, निर्माता-दिग्दर्शक करण जोहरने ‘स्टुडंट ऑफ इअर’साठी तिला ऑफर दिली होती. पण तिने ही ऑफर नाकारली आणि ही भूमिका नंतर आलिया भटला मिळाली.

टॅग्स :कृष्णा श्रॉफटायगर श्रॉफजॅकी श्रॉफ