Join us
Daily Top 2Weekly Top 5

‘भाईजान’च्या सत्याला बॉडीबिल्डिंग टिप्स

By admin | Updated: July 23, 2015 03:20 IST

सलमान खान आपल्या पीळदार शरीरयष्टीसाठी प्रसिद्ध आहे. कोणत्याही चित्रपटात एकदा तरी शर्ट काढल्याशिवाय त्याला चैन पडत नाही.

सलमान खान आपल्या पीळदार शरीरयष्टीसाठी प्रसिद्ध आहे. कोणत्याही चित्रपटात एकदा तरी शर्ट काढल्याशिवाय त्याला चैन पडत नाही. बॉडीबिल्डिंग किती आवश्यक आहे, हे तो इतरांनाही शिकवीत असतो. महेश मांजरेकर यांचा मुलगा सत्या याचा एक मराठी चित्रपट सलमानने पाहिला. त्यानंतर त्याला बॉडीबिल्डिंगच्या टिप्स दिल्या आणि त्याचे महत्त्वही सांगितले. सत्याने आता दररोज दोन तास जिममध्ये जायला सुरुवात केली आहे. सत्या सध्या मराठीमध्ये आपले नशीब अजमावत असला, तरी त्याला बॉलीवूडचे वेध लागले आहेत.