Join us  

Blackbuck Poaching Case : जीवे मारण्याची धमकी देणारा गॅंगस्टर आणि सलमान त्याच तुरुंगात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2018 4:03 PM

गॅंगस्टर लॉरेंस बिश्नोई हाच तोच गुंड आहे ज्याने 4 जानेवारीला कोर्टाच्या आवारातच सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देऊन खळबळ उडवली होती.

बहुचर्चीत काळवीट शिकारप्रकरणी सलमान खान याला जोधपूर कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. त्याच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार नसल्याने त्याला आज जोधपूर तुरुंगात रहावं लागणार आहे. या जेलमध्ये त्याला गॅंगस्टर लॉंरेन्स बिश्नोईकडून धोका असल्याची चर्चा आहे. अर्थात या तुरुंगात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आली. 

गॅंगस्टर लॉरेंस बिश्नोई हाच तोच गुंड आहे ज्याने 4 जानेवारीला कोर्टाच्या आवारातच सलमान खानला जीवे मारण्याची धमकी देऊन खळबळ उडवली होती. तो मीडिसमोर बोलला होता की, मी एक विद्यार्थी आहे. आरोप करणं हे पोलिसांचं कामंच आहे. पण मी जे करणार ते खुलेआम करणार.

हा गॅंगस्टर म्हणाला होता की, तो सलमान खानला जोधपूरमध्ये जीवे मारणार. पण सलमान या धमकीची पर्वा न करताच बुधवारीच जोधपूरमध्ये आला होता. आज त्याला पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

गॅंगस्टर विरोधात अनेक गुन्हे

बिश्नोई विरोधात हत्या, खंडणी, धमकावणे आणि गोळीबार अशी प्रकरणे नोंदवली गेली आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याने एका उद्योगपतीची हत्या केली होती. त्याचे अनेक सहकारीही जोधपूर तुरुंगात आधीच आहेत.  

कोर्टाच्या परीसरात दिली होती धमकी

जेव्हा बिश्नोईला कोर्टात आणण्यात आले, त्यावेळी त्याने सलमान खानला जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीतून त्याने चांगलीच पब्लिसिटी मिळवली होती. कदाचित त्याला सलमान खानचे नाव घेऊन चर्चेत यायचं होतं. पण ही धमकी गंभीरतेने घेण्यात आली.

शिकारमुळे बिश्नोई समाज नाराज

सलमान खानने केलेल्या काळवीटाच्या शिकारीमुळे येथील बिश्नोई समाज आत्तापर्यंत नाराज होता. त्यामुळेच गॅंगस्टर बिश्नोई याने सलमानला धमकी दिली असावी असा अंदाज व्यक्त होतोय. 

सलमानच्या सुरक्षेत वाढ 

बिश्नोई याच्या धमकीमुळे जोधपूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. कोर्ट परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आता सलमान खान याला जामीन न मिळाल्याने आज तुरुंगात जावं लागणार आहे. उद्या त्याच्या जामिनावर सुनावणी होणार आहे.

टॅग्स :काळवीट शिकार प्रकरण