Join us  

‘Black’ सिनेमातील अभिनेत्री आयशा कपूर बॉलिवूडपासून का दुरावली?; कारण ऐकून धक्का बसेल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 19, 2021 11:57 AM

अमिताभ बच्चन यांना या सिनेमासाठी सर्वोकृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. राणी मुखर्जी हिलाही अवार्ड मिळाले होते.

ठळक मुद्देदमदार अभिनयाच्या जोरावर आयशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेआयशा कपूरला या सिनेमासाठी फिल्मफेअर, झी सिने, आइफा अवार्डसह एकूण ७ पुरस्कार मिळाले.भारतीय सिनेमात यूनिक आणि एक्सपेरिमेंटल सिनेमांमध्ये ब्लॅकचा समावेश आहे.

चित्रपट जग असं विचित्र आहे ज्यात जगातील अनेक कहाण्या पडद्यावर दाखवल्या जातात त्याचसोबत काही किस्से, कहाणी रहस्य बनून राहतात. चित्रपट जगातील अभिनेता-अभिनेत्री यांच्याशी निगडीत काही गोष्टी तुम्हालाही आश्चर्यचकीत करायला लावतील. आज आम्ही तुम्हाला एका अभिनेत्रीबाबत सांगणार आहोत जिच्या अभिनयाचं कौतुक सर्वांनी केले. तरीही ती या दुनियेपासून दूर आहे. २००५ मध्ये आलेला सिनेमा ब्लॅक(Black) मध्ये बाल कलाकार म्हणून काम केलेली आयशा कपूर(Ayesha Kapoor) आठवतेय का?

ब्लॅकसाठी मिळाले एकूण ७ अवार्ड

२००५ मध्ये प्रसिद्ध दिग्दर्शक संजय लीला भंसाली यांचा सिनेमा ब्लॅकमध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन(Amitabh Bacchan) यांनी मुख्य भूमिका साकारली होती. त्यात राणी मुखर्जी अभिनेत्री म्हणून काम केले. गुरु-शिष्याच्या कहाणीवर हा सिनेमा आधारीत आहे. अमिताभ बच्चन गुरूच्या भूमिकेत होते. यात राणी मुखर्जी अशी शिष्या दाखवली आहे जिला काहीही बघायला आणि ऐकायला येत नाही. भारतीय सिनेमात यूनिक आणि एक्सपेरिमेंटल सिनेमांमध्ये ब्लॅकचा समावेश आहे. या सिनेमात राणी मुखर्जीच्या लहानपणीची भूमिका आयशा कपूर हिने साकारली आहे. तेव्हा आयशा खूप लहान होती.

अमिताभ बच्चन यांना या सिनेमासाठी सर्वोकृष्ट अभिनयाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. राणी मुखर्जी हिलाही अवार्ड मिळाले होते. त्यावेळी उत्तम कलाकारांपैकी आयशानं सर्वांचे मन जिंकले होते. दमदार अभिनयाच्या जोरावर आयशाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. ही बाल कलाकार आगामी काळात बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींमध्ये नाव कमावेल अशी चर्चा होती. आयशा कपूरला या सिनेमासाठी फिल्मफेअर, झी सिने, आइफा अवार्डसह एकूण ७ पुरस्कार मिळाले. इतक्या प्रसिद्धी झोतात असणारी अभिनेत्री बॉलिवूडपासून का दुरावली हा प्रश्न तुम्हालादेखील पडला असेल.

...म्हणून बॉलिवूडपासून अंतर राखलं

अलीकडेच आयशा कपूरने एका मुलाखतीत सांगितले की, ब्लॅकच्या ४ वर्षानंतर २००९ मध्ये सिकंदर नावाच्या सिनेमात मी काश्मीरी मुलीची भूमिका साकारली होती. मी माझं आयुष्य एकांतात घालवलं त्यामुळे मला प्रसिद्धीची भीती वाटते. माझ्यावर जास्त लक्ष असावं हे मला वाटत नाही असं तिने सांगितले. आयशाने डेब्यू केले तेव्हा ती केवळ ११ वर्षांची होती. त्यामुळे आईवडिलांना तिच्याबद्दल काळजी वाटत होती. आयशाने सिनेमात काम करून शिक्षणाकडे दुर्लक्ष करू नये असं त्यांना वाटायचे. त्यासाठी तिच्या कुटुंबाने मुंबई सोडून मूळ गावी औरोविले येथे परतले. त्यानंतर आयशाचं लक्ष शिक्षणात लागलं. काही काळाने वडिलांनी आयशाला अमेरिकेला पाठवलं. तेथील कोलंबिया विद्यापीठातून तिने पदवीचं शिक्षण घेतलं. आयशा कपूरचा जन्म १३ सप्टेंबर १९९४ मध्ये झाला. तामिळनाडूतील औराविले शहरात तिचं बालपण गेले. आयशाची आई जॅकलीन आणि वडिल पंजाबमध्ये राहणारे दिलीप कपूर बिझनेसमॅन आहेत. आयशाला तिच्या गावाबद्दल खूप आकर्षण आहे. ही जागा भारतातील सर्वात शांत परिसरापैकी एक आहे.

टॅग्स :बॉलिवूडअमिताभ बच्चनराणी मुखर्जी