Join us

Birthday Special : महेश भट्ट यांच्याबद्दलच्या ‘या’ गोष्टी ठाऊक आहेत?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2018 09:48 IST

‘लव्ह, सेक्स, धोखा’ अशा थीम्सवर अनेक हिट चित्रपट देणारे निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांचा आज (20 सप्टेंबर) वाढदिवस. आज जाणून घेऊ या, त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी....

‘लव्ह, सेक्स, धोखा’ अशा थीम्सवर अनेक हिट चित्रपट देणारे निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट यांचा आज (20 सप्टेंबर) वाढदिवस. आज जाणून घेऊ या, त्यांच्याबद्दलच्या काही खास गोष्टी....

महेश भट्ट यांच्या आई-वडिलांचे विधीवत लग्न झाले नव्हते. त्याअर्थाने मी अनौरस अपत्य आहे, असा उल्लेख अलीकडे एका मुलाखतीत महेश भट्ट यांनी केला होता. महेश भट्ट विवाहसंस्थेला फार महत्त्व देत नाहीत, ते याचमुळे.

महेश भट्ट वयाच्या 20 व्या वर्षी कॉलेजमध्ये असताना लोरिए ब्राईट हिच्या प्रेमात पडले. आज तिला किरण भट्ट म्हणून ओळखले जाते. पूजा भट्ट आणि राहुल भट्ट हे किरण व महेश भट्ट यांची मुले. किरण व दोन मुलांसोबत राहत असताना महेश भट्ट अभिनेत्री परवीन बॉबीच्या प्रेमात पडले. यामुळे महेश भट्ट व किरण यांच्या नात्यात मतभेद निर्माण झाले.

अर्थात परवीन बॉबीसोबतचे महेश भट्ट यांचे नातेही फार काळ टिकले नाही. यानंतर महेश यांच्या आयुष्यात सोनी राजदान आली. विशेष म्हणजे, सोनी राजदानसोबतच्या अफेअरदरम्यानही किरण आणि महेश एकत्र राहत होते. यानंतर किरणला घटस्फोट न देताच महेश यांनी सोनी राजदानसोबत लग्न केले. त्यांना आलिया व शाहीन या दोघी मुली झाल्यात.

मोठी मुलगी पूजा भट्ट हिच्यासोबतच्या लिपलॉक सीनवरून झालेला वाद तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. एका मॅगझिनने महेश भट्ट पूजाला किस करत असतानांचा   फोटो छापला होता. या फोटोमुळे प्रचंड खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, महेश यांच्या यानंतरच्या एका वक्तव्याने या वादाच्या आगीत तेल ओतले होते. पूजा माझी मुलगी नसती तर मी तिच्याशी लग्न केले असते, असे महेश म्हणाले होते. त्यांच्या या वक्तव्याची प्रचंड निंदा झाली होती.

 

मुलगा राहुल भट्टसोबत महेश यांचे नाते फार मधूर नाही. मी एका अन्य स्त्रीसाठी घर सोडून जातोय, हे राहुल पाहत होता. त्यामुळे आम्हा बाप-लेकाचे नाते खराब होत गेले. अर्थात हे नाते पूर्र्णपणे संपले नाहीच, असे महेश अलीकडे बोलताना म्हणाले होते.

टॅग्स :महेश भटआलिया भटपूजा भट