मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगण आज आपला 49वा वाढदिवस साजरा करत आहे. 2 एप्रिल 1969 मध्ये दिल्लीत जन्मलेल्या अजयचा बॉलिवूड प्रवास चांगलाच शानदार राहिलाय. अॅक्सन हिरो म्हणून सुरु केलेल्या प्रवासात त्याने वेगवेगळ्या भूमिका करुन त्यानं आपलं अभिनय कौशल्य सिध्द केलंय. चला जाणून घेऊया अजय देवगनबद्दल काही रोमांचक गोष्टी....
1) सर्वांना हेच माहिती आहे की, अजय देवगण याने `फूल और कांटे' सिनेमातून डेब्यू केलं. पण त्याने 1985 साली आलेल्या `प्यारी बहना' या सिनेमातून डेब्यू केलं होतं. या सिनेमात त्याने बालकलाकार म्हणून काम केले होते. यात त्याने मिथुनच्या बालपणीची भूमिका केली होती.
2) अजय देवगण हा किती शांत आणि कमी बोलणारा आहे हे सर्वांनाच माहिती आहे. मात्र त्याची एक खास गोष्ट अजिबात तुम्हाला माहिती नसेल. अजय रोज सकाळी घराबाहेर पडताना आपल्या आई-वडीलाच्या पाया पडून बाहेर पडतो.
3) संजय लिला भन्सालीच्या `बाजीराव मस्तानी' सिनेमात अजयला मुख्य भूमिकेसाठी संपर्क करण्यात आला होता. पण तारखा आणि कमी मानधनामुळे त्याने हा सिनेमा नाकारला.
4) कऱन-अर्जुन सिनेमासाठी दिग्दर्शकाची पहिली पसंती अजय देवगण हा होता. या सिनेमातील सलमान खानचा रोल त्याला ऑफर करण्यात आला होता.
5) अजय देवगण याचे सिनेमे देशातील सर्वच लोक बघतात. पण अजय फार कमी त्याचे सिनेमे बघतो. अजयच्या एका डोळ्यात समस्या असल्याने डॉक्टरने अजयला जास्त सिनेमे बघण्यास मनाई केली आहे.
6) अजय देवगणची काजोलसोबत भेट हलचल सिनेमाच्या सेटवर झाली होती. पण त्यांनी डेटिंग गुंडाराजच्या शूटिंगदरम्यान सुरु केली होती.
7) रिपोर्टनुसार, अजय देवगण आणि अभिषेक बच्चन हे खूप चांगले मित्र आहेत. इतके की, अभिषेक बच्चनने त्याच्या परीवारानंतर केवळ अजयला लग्नाच्या प्लॅनिंगबाबत सांगितले होते.