Join us  

'आमची दत्तक घेतलेली मुलगी...', धाकटी बहिण गौतमीसाठी मृण्मयी देशपांडे लिहिलेली पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2023 4:18 PM

आज अनेक सेलिब्रिटी बहिणींच्या जोड्या मालिका-सिनेमांमधून रसिक प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. यातील एक जोडी मृण्मयी आणि गौतमीची आहे.

मराठी कलाविश्वात जशी स्टार्स आणि स्टार किड्सची जोडी आपल्याला पाहायला मिळते, तशीच सख्या बहिणींची जोडीही मनोरंजन क्षेत्रात काम करत आहेत. आपल्या बहिणीच्याच पावलावर पाऊल ठेवत नाटक, मालिका आणि सिनेमांमधून ह्या कलाकार बहिणी आपलं स्थान निर्माण करतायेत. मृण्मयी देशपांडे आणि गौतमी देशपांडे ही त्यातलीच एक बहिणींची जोडी आहे.मृण्मयी देशपांडेच्या पावलावर पाऊल ठेवत तिची धाकटी बहिण गौतमीने सुध्दा मालिका विश्वात आापल्या अभिनयाची जादू दाखवत प्रेक्षकांच्या मनात सर्वांतच असं वेगळं स्थान निर्माण केलं. 

मृण्मयी आणि गौतमी सोशल मीडियावर सक्रिय असतात. नेहमीच एकमेकींसोबतचे फोटो आणि व्हिडीओ त्या शेअर करत असतात. आज गौतमी देशपांडेच्या वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिची मोठी बहीण मृण्मयीने एक खास पोस्ट सोशल मीडियावर तिच्यासाठी लिहिली आहे. 

मृण्मयीची पोस्ट  आमची दत्तक घेतलेली मुलगी गौतमी देशपांडे हीचा आज हॅप्पी बर्थ डे आहे. आज ती वयानी खूप मोठी झाली आहे.. देव करो आणि वयाला लौकरात लौकर बुद्धी, शहाणपणा, समजूतदार पणा याची पण साथ मिळो.. बाकी प्रेम आहेच... I love you to the moon and back हे लिहावं लागतचं.. म्हणजे ते खरं पण आहेच... So I love you to the moon and back... You are my everything... My entire world... My happiness... ता.क - So I love you पासून वाचा pls आधीच मनातलं होतं... चुकून लिहिलं गेलं...

गौतमी एक अभिनेत्री असण्यासोबतच एक उत्तम गायिका सुध्दा आहे. झी मराठीवरील ”माझा होशील ना” या मालिकेतून गौतमी देशपांडेला लोकप्रियता मिळाली.  दरम्यान मृण्यमयीनं पुन्हा छोट्या पडद्यावर कमबॅक केलं आहे. सन मराठी वाहिनीवरील ‘शाब्बास सुनबाई’ या मालिकेत दिसतेय.

टॅग्स :गौतमी देशपांडेमृण्मयी देशपांडे सेलिब्रिटी