बॉयहूड चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीचा पुरस्कार पॅट्रिशिया अर्क्वेटने मिळवला.
८७व्या ऑस्कर अवॉर्ड्सवर छाप पाडणा-या बर्डमन या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सिनेमॅटोग्राफीचा पुरस्कारही मिळाला. पुरस्कार लिजेता सिनेमॅटोग्राफर इम्यॅन्युअल ल्युबेझ्गी.
सर्वोत्कृष्ट विदेशी भाषेतील चित्रपटाचा पुरस्कार इदाला मिळाला असून तो स्वीकारताना निर्माता पावेल पावलीकोवेस्की.
सर्वोत्कृष्ट सहाय्य्क अभिनेत्याचा पुरस्कार व्हिपलॅशसाठी जे. के. सिमन्सने मिळवला.
व्हिपलॅशचे एडिटर टॉम क्रॉस यांना बेस्ट फिल्म एडिटिंग पुरस्काराने गौरवण्यात आले.
बर्डमॅनचे दिग्दर्शक अलेजांड्रो गोन्झालेझ इनारेटू यांना बर्डमॅनसाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा पुरस्कार देण्यात आला.
बेस्ट ऑरिजनल साँगसाठीचा पुरस्कार सेलमामधल्या ग्लोरी या गाण्यासाठी लोनी लिन व जॉन स्टीफन्सना देण्यात आला.
दी फोन कॉलला बेस्ट लाइव्ह अॅक्शन शॉर्ट फिल्मने गौरवण्यात आले. या सिनेमातील कलाकार जेसन बेटमन मॅट कर्कबी जेम्स लुकास व केरी वॉशिंग्टन.
बेस्ट साउंड एडिटिंगचा पुरस्कार अमेरिकन स्नायपरच्या बब अस्मान व अॅलन रॉबर्ट मरे यांनी स्वीकारला.
बेस्ट मेकअप व हेअर स्टाइलचा पुरस्कार दी ग्रँड बुडापेस्ट हॉटेलच्या रॅन्सेस हॅनन व मार्क कुलिअर यांनी पटकावला.
दी इमिटेशन गेमसाठी बेस्ट अडॉप्टेड स्क्रीन प्लेचा पुरस्कार ग्रॅहम मूर यांना मिळाला.
व्हिपलॅशसाठी बेस्ट साउंड मिक्सिंगसाठी बेन विल्किन्स थॉमस कर्ली व क्रेग मान यांना गौरवण्यात आले.
२३ फेब्रुवारी रोजी हॉलीवूडमध्ये रंगलेल्या ८७व्या ऑस्कर सोहळ्यामध्ये एडी रेडमाइनला दी थिअरी ऑफ एव्हरीथिंग या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून गौरवण्यात आले. केट ब्लँचेटच्या हस्ते त्याने पुरस्कार स्वीकारला.