Join us

ऑस्करवर बर्डमॅनचे वर्चस्व

By admin | Updated: February 23, 2015 10:57 IST

लॉस एंजेलिसमध्ये रंगलेल्या ८७ व्या ऑस्कर पुरस्कारात बर्डमॅन चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट चित्रपट यासह चार पुरस्कार पटकावले.

ऑनलाइन लोकमत

लॉस एंजेलिस, दि. २३ - सिनेसृष्टीत मानाचा समजल्या जाणा-या ऑस्कर पुरस्कारावर यंदा बर्डमॅनने वर्चस्व गाजवले. लॉस एंजेलिसमध्ये रंगलेल्या ८७ व्या ऑस्कर पुरस्कारात बर्डमॅन चित्रपटाने सर्वोत्कृष्ट चित्रपट, सर्वोत्कृष्ट चित्रपट यासह चार पुरस्कार पटकावले. 

लॉस एंजेलिसमध्ये ८७ वा ऑस्कर पुरस्कार सोहळा पार पडला. यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये ज्यूलियन मूरला 'स्टील अॅलिस' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला. तर 'द थिअरी ऑफ एव्हरीथिंग' या चित्रपटासाठी एडी रेडमाईनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. बर्डमॅनसाठी आलेहांद्रो इनारितोला सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला.

ऑस्कर २०१५ चे मानकरी

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री - पॅट्रिशिया अर्क्वेट (बॉयहूड)

सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता - जे.के. सिमन्स (विप्लश)

सर्वोत्कृष्ट चित्रपट (परदेशी भाषा विभाग) - ईडा (पोलंड)

सर्वोत्कृष्ट माहितीपट - क्रायसिस हॉटलाइन : व्हेटरन्स प्रेस वन 

सर्वोत्कृष्ट शॉर्टफिल्म - द फोन कॉल 

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड शॉर्टफिल्म - फिस्ट

सर्वोत्कृष्ट अॅनिमेटेड फिचर फिल्म - बिग हिरो ६