बिपाशा बासूने आजवरच्या तिच्या करिअरमध्ये बरेच बोल्ड सीन्स केले आहेत; पण या अभिनेत्रीच्या मते तिच्या आगामी ‘अलोन’ या हॉरर चित्रपटातील भूमिका तिची आजवरची सर्वात बोल्ड भूमिका असेल. भूषण पटेल यांचे दिग्दर्शन असलेल्या या चित्रपटात बिपाशा आणि करण सिंह ग्रोवर यांच्यावर अनेक बोल्ड सीन्स चित्रित करण्यात आल्याचे तिचे म्हणणो आहे. ‘जिस्म’, ‘राज’ आणि ‘राज 3-डी’ अशा चित्रपटांमध्ये काम करणा:या बिपाशाने सांगितले की, ‘ही एक पॅशनेट लव्ह स्टोरी आहे. हा एक हॉरर चित्रपट आहेच; पण त्याशिवाय चित्रपटाची कथा लव्ह ट्रँगलवर आधारित आहे. एक तरुण, तरुणी आणि एका भुताचा हा लव्ह ट्रँगल असणार आहे. अनेक टीव्ही मालिकांमध्ये झळकलेला करण सिंह ग्रोवर या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा चित्रपट येत्या 16 जानेवारीला
प्रदर्शित होईल.