अभिनेत्री बिपाशा बासूच्या मते चित्रपट उद्योगात एवढी स्पर्धा आहे की, येथे असुरक्षिततेची भावना मनात घर करून जाते. बिपाशा म्हणाली की, चित्रपट उद्योग तुमच्या मनात असुरक्षेची भावना निर्माण करू शकते, कारण येथे नेहमीच तुमच्यावर करो या मरोची परिस्थिती असते. एकीकडे चित्रपट उद्योगात अशी परिस्थिती आहे हे मान्य करताना दुसरीकडे तिला या भावनेशी मुकाबला करता आल्याचे ती सांगते. ती म्हणाली, ‘तुम्ही माझ्यासारखा चित्रपटांचा आनंद घेत असाल, तर तुमची १४ वर्षे शांततेत निघून जातील. मला माहितीय, या क्षेत्रात हा काळही कमीच आहे. कारण या क्षेत्रात तुम्ही एवढ्या वर्षांपासून आहात, याची जाणीव होत नाही. मी काहीही एजेंडा नसलेल्या लोकांपैकी एक आहे, त्यामुळेच कदाचित असुरक्षिततेच्या भावनेशी मुकाबला करू शकले.’
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}