Join us
Daily Top 2Weekly Top 5

 दिवाळी पार्टीत दिसली ही अभिनेत्री, देणार का ‘गुड न्यूज’?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 14:16 IST

या अभिनेत्रीचे ताजे फोटो पाहिल्यानंतर ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज नेटक-यांनी व्यक्त केला आहे.

ठळक मुद्दे30 एप्रिल 2016 मध्ये करणने ‘अलोन’ या चित्रपटातील त्याची को-स्टार राहिलेल्या बिपाशा बसूसोबत तिसरा संसार थाटला.

लग्नानंतर बिपाशा बासू अचानक बॉलिवूडमधून गायब झाली. आता बिपाशा केवळ बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये तेवढी दिसते. अर्थात तरीही चर्चेत असते. सध्या बिपाशा एका वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. होय, बिपाशा प्रेग्नंट असल्याच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे. अर्थात हे आमचे नाही तर बिपाशाच्या चाहत्यांचे मत आहे. बिपाशाचे ताजे फोटो पाहिल्यानंतर ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज नेटक-यांनी व्यक्त केला आहे.

 

बिपाशा नुकतीच रमेश तौरानी यांच्या दिवाळी पार्टीत दिसली. यावेळी तिने पती करण सिंग ग्रोव्हरसोबत मीडियाला जोरदार पोज दिल्यात. पतीसोबत तिची रोमॅन्टिक केमिस्ट्रीही दिसली. पण लोकांचे लक्ष बिपाशाच्या बेबी बम्पकडे गेले. फोटोत बिपाशाचे बेबी बम्प दिसतेय. मग काय, अनेक चाहत्यांनी तिच्या प्रेग्नंसीचा अंदाज बांधला. अर्थात काहींच्या मते, बिपाशाने घातलेल्या ड्रेसमुळे हा गोंधळ झालाय. खुद्द बिपाशाने अद्याप काहीही खुलासा केलेला नाही. आता खरे काय ते बिपाशाच जाणो.

 

खरे तर यापूर्वीही बिपाशाच्या प्रेग्नंसीची चर्चा रंगली होती. काही महिन्यांपूर्वी पतीसोबत ती एका हॉस्पिटलबाहेर स्पॉट झाली होती. यावरून तिच्याकडे ‘गुड न्यूज’ असावी असा अंदाज वर्तवला गेला होता. अर्थात हा अंदाज खोटा ठरला होता.

 बिपाशा बासू करण सिंग ग्रोवरची तिसरी पत्नी आहे. याअगोदर दोनदा लग्नगाठीत अडकलेल्या करणने पहिले लग्न 2008 मध्ये टीव्ही अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत केले होते. पण फक्त दहा महिनेच हे लग्न टिकले. त्यानंतर 2012 मध्ये करणने त्याची को-स्टार जेनिफर विगेंटसोबत दुसरे लग्न थाटले. पण हे नातेही फार काळ टिकले नाही आणि 2014 मध्ये दोघे विभक्त झाले. त्यानंतर 30 एप्रिल 2016 मध्ये करणने ‘अलोन’ या चित्रपटातील त्याची को-स्टार राहिलेल्या बिपाशा बसूसोबत तिसरा संसार थाटला.

टॅग्स :बिपाशा बासू