Join us  

Lakshadweep vs Maldives: मालदीव ट्रीपवरुन ट्रोल झाल्यानंतर बिपाशा बासूने डिलीट केले Photos

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 2:23 PM

सोशल मीडियावरची ही सगळी निगेटिव्हिटी पाहता बिपाशा आणि पती करणसिंह ग्रोवरने मालदीवचे सगळे फोटो डिलीट केले आहेत. 

Lakshadweep vs Maldives: सोशल मीडियावरमालदीव विरुद्ध लक्षद्वीप असा वाद सुरु असतानाच पतीआणि लेकीसोबत मालदीवला फिरायला गेलेल्या अभिनेत्री बिपाशा बासूला (Bipasha Basu) चांगलंच ट्रोल करण्यात आलं. इतकंच नाही तर बिपाशावर देशद्रोही अशा कमेंटही केल्या गेल्या. सोशल मीडियावरची ही सगळी निगेटिव्हिटी पाहता बिपाशा आणि पती करणसिंह ग्रोवरने (Karansingh Grover) मालदीवचे सगळे फोटो डिलीट केले आहेत. 

मालदीवच्या काही मंत्र्यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केली. मोदींच्या लक्षद्वीप फोटोंवरुन त्यांनी काही रिमार्क्स दिले होते. यानंतर सोशल मीडियावर बॉयकॉट मालदीवची लाट आली. मनोरंजन, उद्योग तसंच क्रीडा क्षेत्रातील दिग्गजांनी आणि सामान्य लोकांनीही लक्षद्वीपला प्रमोट करायला सुरुवात केली. याचा परिणाम असा की मालदीवने संबंघित मंत्र्यांना थेट निलंबितच केले. तरी अजूनही सोशल मीडियावर मालदीवविरुद्धचा राग कायम आहे. दरम्यान या सर्व वादात बिपाशा बासू आणि करणसिंह ग्रोवर लेकीला घेऊन मालदीव येथे सुट्ट्या एन्जॉय करत होते.

तेव्हा त्यांच्या फोटोंवर नेटकऱ्यांनी कमेंट करत दोघांना चांगलंच धारेवर धरलं. 'अर्धी फिल्म इंडस्ट्री बॉयकॉट मालदीव्हज बोलत आहे आणि तुम्ही मालदीवला प्रमोट करत आहात. शेम ऑन यू' अशा प्रकारच्या कमेंट्स त्यांच्या फोटोंवर आल्या. आता अखेर दोघांनी मालदीवचे फोटो डिलीट करणंच पसंत केलं आहे. 

बिपाशा आणि करण मालदीवमध्ये वेळ घालवत असतानाच अनेकांनी त्यांना परत येण्याचं आव्हान केलं. एक जागरुक भारतीय नागरिक म्हणून मालदीव रद्द करुन लक्षद्वीपला फिरायला जा' अशी विनंती केली. बिपाशा नुकतीच भारतात परत आली असून तिने फोटोही डिलीट केले आहेत. 

टॅग्स :बिपाशा बासूमालदीवलक्षद्वीपसोशल मीडियाट्रोल