अभिनेता देवदत्त नागे काहीही केल्या त्याचं पहिलं प्रेम लपवू शकलेला नाहीये. होय, देवदत्तचं पहिलं प्रेम आहे त्याची बाईक... बाईक चालवणं देवदत्तला भलतंच आवडतं. त्यानं त्याचं हे बाईकप्रेम वेळोवेळी उघड केलंय.. याचीच प्रचिती त्याचा हा फोटो पाहून तुम्हालाही येईल. सोशल मीडियावर देवदत्तने बाईकसोबतचा एक फोटो शेअर केला आहे. आपल्या खास अंदाजात बाईकवरून तो मस्त फेरफटका मारत असतो. सोशल मीडियावर शेअर केलेल्या फोटोमध्ये डोक्यावर कॅप घालून रॉकिंग आणि रफ एंड टफ अंदाजात देवदत्त पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे देवदत्तला त्याच्या फ्री टाईममध्ये बाईकवर ‘फुल आॅन’ फिरायला आवडतं. तसेच बाईक चालवायला प्रत्येकाला आवडतं. मात्र, बाईक चालवताना हॅल्मेट घाला. सुरक्षिततेचे सगळे मार्ग अवलंबा, असे तो आवर्जून सांगतो.
बाईकवेडा देवदत्त !
By admin | Updated: July 14, 2017 02:55 IST