Join us  

Bigg boss फेम वीणा जगतापचं घर पाहिलंय का? सेलिब्रिटी असूनही जपलाय मध्यमवर्गीयपणा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 7:00 AM

Veena jagtap: लोकप्रियतेच्या आणि यशाच्या शिखरावर असलेली वीणा खऱ्या आयुष्यात अत्यंत साध्या पद्धतीने राहते.

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे वीणा जगताप (veena jagtap). उत्तम अभिनयामुळे चर्चेत येणाऱ्या वीणाला बिग बॉस मराठीमुळे खऱ्या अर्थाने ओळख मिळाली. या शोमुळे वीणाच्या प्रोफेशनल लाइफसोबतच पर्सनल आयुष्याचीही नेटकऱ्यांमध्ये चर्चा रंगली होती. परंतु, सध्या वीणा तिच्या घरामुळे चर्चेत येत आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटी म्हणून वीणाकडे पाहिलं जातं. त्यामुळे सहाजिकच तिचा स्टारडम आणि फॅनफॉलोअर्सही तितकाच दांडगा आहे. विशेष म्हणजे लोकप्रियतेच्या आणि यशाच्या शिखरावर असलेली वीणा खऱ्या आयुष्यात अत्यंत साध्या पद्धतीने राहते.  सध्या सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यात तिच्या घराची झलक दिसून येत आहे.

वीणाचं एक युट्यूब चॅनल असून यात ती व्लॉगच्या माध्यमातून नेटकऱ्यांसोबत तिच्या जीवनातील लहानमोठ्या गोष्टी शेअर करत असते. यात अलिकडेच तिने तिच्या बर्थ डे सेलिब्रेशनचा व्हिडीओ शेअर केल्याचं पाहायला मिळालं. याच व्हिडीओमध्ये वीणाच्या घराची लहानशी झलकही दिसली.वीणा खऱ्या आयुष्यात अत्यंत साध्या पद्धतीने राहत असून तिचं घरदेखील तुमच्या आमच्यासारखंच आहे. वीणाचं घर अत्यंत नीटनेटकेपणाने सजवलं आहे. त्याच्या हॉलमध्ये देव्हारा असून घरातील रंगसंगतीही उत्तम असल्याचं पाहायला मिळतं. 

दरम्यान, वीणाचं घर पाहिल्यावर 'ही तर आपल्यासारखीच मध्यवर्गीय असल्यासारखी राहते', असं नेटकऱ्यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर तिचा साधेपणा नेटकऱ्यांना भावतो आहे. वीणा उत्तम अभिनेत्री असण्यासोबतच एक मेकअप आर्टिस्टही आहे. याविषयीदेखील तिने एक पोस्ट शेअर केली होती.

 

टॅग्स :वीणा जगतापसेलिब्रिटीटेलिव्हिजनबिग बॉस मराठी