Join us  

जाळ अन् धूर संगटच ! महाराष्ट्राची मिरची अमृता धोंगडेचा ठसकेदार परफॉर्मन्स, BIG BOSS 4 FINALE फक्त काही तास बाकी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 08, 2023 2:43 PM

बिग बॉस मराठी सिझन ४ चा आज ग्रॅड फिनाले रंगणार आहे. १०० दिवसांचा टप्पा परा करुन अखेर पाच स्पर्धक फिनाले मध्ये पोहोचले आहेत. संध्याकाळी ७ वाजता ग्रॅंड फिनालेला सुरुवात होईल.

BIG BOSS 4 FINALE  : बिग बॉस मराठी सिझन ४ चा आज ग्रॅड फिनाले रंगणार आहे. १०० दिवसांचा टप्पा परा करुन अखेर पाच स्पर्धक फिनाले मध्ये पोहोचले आहेत. संध्याकाळी ७ वाजता ग्रॅंड फिनालेला सुरुवात होईल. त्यामुळे आता काहीच तास शिल्लक राहिले आहेत. फिनालेपूर्वी स्पर्धकांच्या डान्स परफॉर्मन्सने प्रेक्षकांचे मनोरंजन होणार आहे. दरम्यान बिग बॉसच्या घरातील मिरची म्हणजेच अमृता धोंगडे (Amruta Dhongde) तिच्या ठसकेदार परफॉर्मन्ससाठी सज्ज झाली आहे. 

कलर्स मराठीने पोस्ट केलेल्या नवीन प्रोमोमध्ये महाराष्ट्राची मिरची सर्वांची लाडकी अमृता प्रेक्षकांना फिनाले पाहण्याचे आवाहन करत आहे.मिसेज मुख्यमंत्री फेम अमृता धोंगडे बिग बॉसच्या घरातीस एक स्ट्रॉंग स्पर्धक आहे. म्हणूनच तिने टॉप ५ (Top 5) मध्ये आपली जागा मिळवली आहे. अमृता म्हणजे आपली कोल्हापूरची बिजली स्टेजवर आग लावण्यास सज्ज आहे. अमुचा डान्स म्हणजे काटा किर्र, कडक, आता हिला तरी विनर बनवा अशा कमेंट अमृताच्या चाहत्यांनी केल्या आहेत.

बिग बॉसच्या घरातील या मिरचीने थेट ड्रामा क्वीन राखी सावंतसोबत पंगा घेतला होता. तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटले होते. रडायचं नाही तर आता लढायचं असा सल्ला अमृताच्या वडिलांनी तिला फॅमिली विक मध्ये बिग बॉसच्या घरात आल्यानंतर दिला होता. अमृताने फिनाले मध्ये तर मजल मारलीच आहे आता बिग बॉस च्या चौथ्या पर्वाची ट्रॉफी अमृताच घेऊन जाते का हे काही तासांतच स्पष्ट होईल.

टॉप ५ सदस्य कोण? बिग बॉस मराठी 4’च्या या शेवटच्या आठवड्यात मिड वीक एव्हिक्शन झालं. त्यामध्ये वाईल्ड कार्ड म्हणून आलेला अभिनेता आरोह वेलणकर घरातून बाहेर पडला. तर याआधी रविवारी झालेल्या एलिमिनेशनमध्ये अभिनेता स्पर्धक प्रसाद जवादे घराबाहेर पडला होता. प्रसाद यंदाच्या सीजनचा एक स्ट्रॉंग स्पर्धक समजला जात होता, अनेकांनी त्याला फायनलमध्ये पाहण्याची अपेक्षा व्यक्त केली होती. परंतु तो बाहेर पडल्याने अनेकांना धक्का बसला होता. दरम्यान पाच स्पर्धक फायनलमध्ये पोहोचले आहेत यामध्ये अपुर्वा नेमळेकर (Apurva Nemlekar), किरण माने (Kiran Mane), अक्षय केळकर(Akshay Kelkar), अमृता धोंगडे (Amruta Dhongde) आणि राखी सावंतचा (Rakhi Sawant) समावेश आहे.

दावेदार सगळेच पण विनर एक

महेश मांजरेकर (Mahesh Manjarekar) यांचे सूत्रसंचालन आणि टॉप ५ स्पर्धकांची वाढलेली धाकधूक. बिग बॉस ४ चे पर्व आज अखेर संपत आहे.  संध्याकाळी ७ वाजता ग्रॅंड फिनालेला सुरुवात होणार आहे. दावेदार सगळेच पण विजेता किंवा विजेती एकच असणार आहे. बघुया या चौथ्या पर्वाची ट्रॉफी कोण घेऊन जातं ते.

टॅग्स :बिग बॉस मराठीअमृता धोंगडेअपूर्वा नेमळेकरकिरण मानेराखी सावंतमहेश मांजरेकर