Join us  

जाणून घ्या बिग बॉसने का म्हटले,... तर सर्व सदस्यांना करणार नॉमिनेट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 04, 2019 4:04 PM

बिग बॉस मराठी २ हा कार्यक्रम सुरू झाल्यापासूनच हा कार्यक्रम प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे.

ठळक मुद्देपोपटाचा पिंजरा या टास्कवरूनच बिग बॉसने हे जाहीर केले की, जर सदस्यांनी कुणाला नॉमिनेट केलं नाही तर बिग बॉस घरातील सर्व सदस्यांना नॉमिनेट करतील.

बिग बॉस मराठीच्या घरात पोपटाचा पिंजरा हा टास्क सुरू आहे... ज्यावरून घरामध्ये काल बरेच वाद देखील झाले... मैथिली नेहावर काल खूप चिडली. कारण नेहाने दिलेले कारण मैथिलीला अजिबात पटले नाही... मैथिलीने नेहाला कॅप्टनसी मिळावी म्हणून वोट दिले होते, जेव्हा हे मैथिलीने नेहाला सांगितले... तेव्हा नेहा म्हणाली मला कुणावरही विश्वास नाही... नेहाच्या या वक्तव्यावर मैथिलीने नाराजी व्यक्त केली... काल या टास्क मध्ये पराग, वीणा, माधव हे नॉमिनेट झाले... आज या टास्कवरूनच बिग बॉसने हे जाहीर केले की, जर सदस्यांनी कुणाला नॉमिनेट केलं नाही तर बिग बॉस घरातील सर्व सदस्यांना नॉमिनेट करतील. आता पुढे काय होईल? सर्व सदस्य नॉमिनेट होतील? हे आज कळेलच.

इतकेच नसून शिवानी, शिव आणि दिंगबर यांनी मिळून बिचुकले यांची थोडीशी गंमत करण्याचे ठरवले... अभिजीत बिचुकले बाथरूम मध्ये असताना त्यांनी लाईट सतत बंद-चालू केली. त्यामुळे ते खूप वैतागले... पण यानंतर त्यांचा राग अजूनच वाढला ... कारण, कालच्या पोपटचा पिंजरा या टास्क मध्ये बिचुकलेनी परागला नॉमिनेट केले आणि त्यामुळे आता पराग त्यांना वारंवार चिडवताना दिसणार आहे. तो म्हणणार आहे की, “साताऱ्यामध्ये परतीचे पेढे तयार ठेवा.” या वाक्यामुळे अभिजीत बिचुकले यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी पराग यांना खडसावले... या घरात कोण जाणार कोण जाणार ते तुम्ही ठरवू नका... आता या भांडणाचं पुढे काय होईल? हे आजच्या भागामध्ये प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

तसेच बिग बॉस म्हटला की, या घरात काही जण एकमेकांचे चांगले फ्रेंड्स बनतात तर काही जण एकमेकांचे चेहरे पाहायला देखील तयार नसतात. बिग बॉसचा कुठल्याही भाषेमधला सिझन असो या कार्यक्रमातील टीम सदस्यांच्या भांडणामुळेच हा कार्यक्रम चर्चेत असतो. आता बिग बॉस मराठी २ च्या घरात प्रेक्षकांना आता वीणा जगताप आणि वैशाली माडे यांचे कडाक्याचे भांडण पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :बिग बॉस मराठीअभिजीत बिचुकलेवीणा जगतापवैशाली माडेशिवानी सुर्वेशीव ठाकरेदिगंबर नाईक