Join us  

विशाल निकम अन् पूजा बिरारीची होतीये चर्चा; नेमकं प्रकरण आहे तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 6:06 PM

Vishal nikam: सोशल मीडियावर सध्या पूजा आणि विशाल यांचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्यांच्याविषयी अनेक चर्चांना उधाण आलं आहे.

छोट्या पडद्यावरील वादग्रस्त पण तितकाच चर्चेत येणारा कार्यक्रम म्हणजे बिग बॉस मराठी (bigg boss marathi). आतापर्यंत या शोचे चार पर्व पार पडले असून प्रत्येक पर्वातील सेलिब्रिटी सातत्याने सोशल मीडियावर चर्चेत येत असतात. सध्या बग बॉस ३ चा विजेता विशाल निकम (vishal nikam) चर्चेत येत आहे. विशाल सध्या अभिनेत्री पूजा बिरारीमुळे (pooja birari)  चर्चेत येत आहे.

 सोशल मीडियावर सध्या पूजा आणि विशाल यांचे काही फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यात अलिकडेच त्यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी एकसारखे दिसणारे कपडे परिधान केले होते. त्यांचे कपडे पाहून अनेकांनी उलटसुलट चर्चा केल्या होत्या. परंतु, यामागचं खरं कारण काही वेगळंच आहे.

पूजा आणि विशाल लवकरच एका मालिकेत एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. ही मालिका प्रेमकथेवर आधारित असल्याचं म्हटलं जात आहे. TRP मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यानुसार, पूजा आणि विशाल एकत्र स्क्रीन शेअर करणार आहेत. अद्याप तरी या मालिकेचं नाव आणि त्यातील कलाकार मंडळी  यांची नावं गुलदस्त्यात आहेत. त्यामुळे आता या मालिकेविषयी जाणून घेण्यासाठी प्रेक्षक कमालीचे उत्सुक झाले आहेत.

टॅग्स :टेलिव्हिजनविशाल निकमसेलिब्रिटीटिव्ही कलाकारमराठी अभिनेता