Join us
Daily Top 2Weekly Top 5

"जेलमध्ये असताना माझ्या डाळीत उंदीर सापडायचे", बॉलिवूड अभिनेत्याने शेअर केला अनुभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2023 19:12 IST

ड्र्ग्ज केस प्रकरणात तुरुंगवास भोगलेल्या 'बिग बॉस' फेम अभिनेत्याने सांगितला अनुभव

बॉलिवूड अभिनेता एजाज खान ड्रग्ज केस प्रकरणात तुरुंगात होता. २६ महिन्यांचा तुरुंगवास भोगल्यानंतर 'बिग बॉस' फेम एजाजची १९ जूनला तुरुंगातून जामीनावर सुटका करण्यात आली. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर एजाजने एका मुलाखतीत जेलमधील अनुभव शेअर केला आहे. 

'ईटाइम्स'ला दिलेल्या मुलाखतीत एजाज म्हणाला, "तुरुंगात असताना मी खूप काही शिकलो. मी तिथे पुस्तकं वाचायचो. तेथील जेवणामुळे मला अन्नाची किंमत कळाली. तुरुंगात असलेल्या गँगस्टर्समुळे मला आयुष्याचं महत्त्व कळालं. तिथे मी डाळ रोटी आणि दगडासारखा कडक भात खायचो. आज मला कोणी थोडं अन्न दिलं तरी ते मी आनंदाने खाईन. तुरुंगात ४०० माणसांसाठी फक्त तीनचं बाथरुम असायचे." 

दोन लग्नांनंतरही 'या' बॉलिवूड अभिनेत्रीच्या प्रेमात पडलेले धर्मेंद्र, हेमा मालिनींना कळलं अन्...

"जेलमधून बाहेर आल्यानंतर नॉर्मल आयुष्य जगायला मला महिनाभर वेळ द्यावा लागला. स्वच्छ बाथरुममध्ये अंघोळ आणि चांगलं जेवण मी कसं जेवू, हेच मला कळत नव्हतं. जेलमध्ये असताना माझ्या डाळीत उंदीर आणि कीडे सापडायचे. त्यामुळे तुरुंगातून सुटल्यानंतर मी नॉर्मल आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत होतो. मी फक्त एक चादर घेऊन जमिनीवर झोपायचो," असंही पुढे एजाज म्हणाला. 

"राज ठाकरे यारों का यार", अतुल परचुरेंचं वक्तव्य, म्हणाले, "त्याने एकदा फोन करुन..."

एजाज खानने २००३ मध्ये आलेल्या ‘पथ’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. 'एक द पॉवर ऑफ वन', 'लम्हा', 'अल्लाह के बंदे' यांसारख्या चित्रपटातही तो दिसला होता. त्याने अनेक मालिका तसेच तेलुगु चित्रपटातही काम केलं आहे. 

टॅग्स :बॉलिवूडबिग बॉस