Join us
Daily Top 2Weekly Top 5

सगळे काही करा, पण हे करू नका! ‘बिग बॉस12’च्या स्पर्धकांना राखी सावंतचा सल्ला!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2018 21:54 IST

बिग बॉसच्या घरात प्रवेश घेणार असलेल्या स्पर्धकांसाठी काही टीप्स आहेत.  ‘बिग बॉस’च्या पहिल्या सीझनची स्पर्र्धक राहिलेली राखी सावंतने या टीप्स दिल्या आहेत.

सलमान खानचा ‘बिग बॉस12’ हा रिअ‍ॅलिटी शो लवकरचं येतोय. खरे तर सलमानचा हा शो नेहमी वादांमुळेचं चर्चेत राहत आलाय. या शोला देशातील सर्वाधिक कॉन्ट्रोवर्सिअल शो असे म्हटले तरी अतिशयोक्ती होणार नाही. बिग बॉसच्या घरात टिकणे म्हणूनचं सोपे नाही. या शोचे १२ वे सीझन लवकरचं सुरू होतेय. या सीझनबद्दल प्रचंड उत्सुकता पाहायला मिळतेय. यावेळी बिग बॉसच्या घरात जाणारे स्पर्धक कोण असणार, हे जाणून घेण्यासही शोचे चाहते उत्सूक आहेत. पण त्याआधी बिग बॉसच्या घरात प्रवेश घेणार असलेल्या स्पर्धकांसाठी काही टीप्स आहेत.  ‘बिग बॉस’च्या पहिल्या सीझनची स्पर्र्धक राहिलेली राखी सावंतने या टीप्स दिल्या आहेत.

 पीटीआयला दिलेल्या एका मुलाखतीत बोलताना राखीने या टीप्स दिल्यात. स्वत:ला या इंडस्ट्रीत टिकवून ठेवण्यासाठी आणि स्वत:चे आयुष्य अधिक चांगले बनवण्यासाठी या संधीचा फायदा घ्या. बिग बॉसच्या घरात भांडा, एकमेकांवर तुटून पडा. पण फक्त एक गोष्ट करू नका. ती म्हणजे, सलमान खानसोबत पंगा घेऊ नका. कारण सलमानसोबत पंगा म्हणजे, तुम्ही घराच्या बाहेर पडणार आणि इथून बाहेर पडल्यावर इंडस्ट्रीही तुम्हाला बाहेर काढणार, असे राखी म्हणाली. राखी म्हणतेय, त्यात दम तर आहेच. त्यामुळेच राखीने दिलेल्या या टीप्स संभाव्य स्पर्धकांच्या निश्चितपणे कामी येतील, यात कुठलेही दुमत नाही. ‘बिग बॉस12’मध्ये कॉमेडीयन भारती सिंह पती हर्ष लिम्बाचियासोबत दिसणार आहे. याशिवाय माहिका शर्मा, सुमेर पसरीचा, सृष्टी रोडे, दीपिका कक्कड यांची नावेही चर्चेत आहेत.वादग्रस्त वक्तव्य करून नेहमीच चर्चेत राहणारी आयटम गर्ल राखी सावंत हिने तिच्या करिअरची सुरुवात ‘अग्निचक्कर’ या चित्रपटातून केली. मात्र राखी तिच्या फिल्मी करिअरपेक्षा वादग्रस्त वक्तव्यांमुळेच अधिक चर्चेत राहिली आहे.

टॅग्स :राखी सावंतसलमान खानबिग बॉस 12