Join us
Daily Top 2Weekly Top 5

Bigg Boss 3 Upadate: असं काय घडलं की, स्पर्धकांनी घरामध्ये विशालला पाडलं एकटं ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2021 14:47 IST

त्र गायत्री आणि मीरामध्ये झालेल्या जोरदार भांडणामुळे त्या दोघींमध्ये फुट पडली आहे. तर दूसरीकडे, विशालशी कुठेतरी विकास आणि मीनल नाराज आहेत.

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये अगदी पहिल्या आठवड्यापासून दोन ग्रुप खूप चर्चेमध्ये राहिले ज्यामधील सदस्यांनी टास्क गाजवले आणि बिग बॉसचे घर दणाणून सोडले आणि ते ग्रुप म्हणजे A आणि B. जय, उत्कर्ष, मीरा आणि गायत्री या ग्रुपमधील सदस्यांमध्ये देखील वादावादी झाली पण टास्क आला की ते एकत्र येतात असे बर्‍याचदा घडले आणि अजूनही घडत आले आहे. पण, आता मात्र गायत्री आणि मीरामध्ये झालेल्या जोरदार भांडणामुळे त्या दोघींमध्ये फुट पडली आहे. तर दूसरीकडे, विशालशी कुठेतरी विकास आणि मीनल नाराज आहेत. तर, झाल्याप्रकारामुळे सोनाली आणि विशाल एकमेकांशी अजिबात बोलत नाही. आणि त्यामुळे विशाल घरामध्ये एकटा पडला आहे. त्याचबाबतीत विकास आणि मीनल यांची सोनालीसोबत चर्चा होताना आज दिसणार आहे.

 विकास सोनालीला सांगताना दिसणार आहे, सोनाली आज बोलणार आहेस की नाही त्याच्याशी. क्लिअर करा ना गोष्टी. सोनालीचे म्हणणे आहे, एक मिनिट तुला असं वाटतं मी त्याच्याशी बोलायला पाहिजे. मला किती त्रास झाला, मी कुठल्या मनस्थितीमधून गेले हे तुला माहिती नाहीये का. विकास म्हणाला, बोल म्हणजे मांडवली कर असं नाही म्हणत आहे मी.जाब विचार. मला कधी वाटतं बोलावं कधी कधी अजिबात बोलू नये. चुका त्याच्याकडून झाल्या. सोनाली म्हणाली, मी तुम्हांला नाही म्हंटल त्याच्याशी बोलू नका.  मीनल म्हणाली, मनातूनच येत नाहीये त्याच्याशी बोलावं. सॉरी बोलून गोष्टी नीट होऊ शकतात पण इगोमुळे कोणीच बोलत नाहीये.बघूया आता या ग्रुपमधील सदस्यांचा अबोला कधी तुटेल ? कधी ते पुन्हा एकत्र येतील..हे पाहणे रंजक असणार आहे. 

टॅग्स :बिग बॉस मराठी