Join us  

 Bigg Boss 16: सलमाननं "इशारों...इशारों में..." सांगितलं 'बिग बॉस 16'च्या विजेत्याचं नाव...!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 11:55 AM

 Bigg Boss 16: बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार हे येत्या 12फेब्रुवारीला कळणार आहेच. पण त्याआधीच सलमान खानने इशारों इशारों में विजेत्या स्पर्धकाच्या नावाचे संकेत दिलेत.

'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) हा लोकप्रिय कार्यक्रम आता अंतिम टप्प्यात आला असून या पर्वात कोण बाजी मारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. या पर्वात 'बिग बॉस मराठी'च्या (Bigg Boss) दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे (Shiv Thakare) विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. पण प्रियंका चहर चौधरी (Priyanka Chahar Choudhary) ही सुद्धा शर्यतीत आहे. या दोघांपैकी बिग बॉसची ट्रॉफी कोण जिंकणार हे येत्या 12फेब्रुवारीला कळणार आहेच. पण त्याआधीच सलमान खानने इशारों इशारों में का होईना विजेत्या स्पर्धकाच्या नावाचे संकेत दिलेत. होय, 'बिग बॉस 16' ची विनर अन्य कुणी नाही तर प्रियंका असणार आहे. किमान 21 जानेवारीचा एपिसोड पाहिल्यानंतर तरी हेच वाटतंय.

वीकेंड का वारमध्ये सलमान येतो आणि अनेकांची शाळा घेतो. प्रियंका चौधरी अनेकदा सलमानच्या निशाण्यावर आली. अनेकदा तो तिचा क्लास घेताना दिसून आला. प्रियंका सतत इतरांच्या मुद्यांमध्ये नाक खुपसताना दिसते, सलमान याचवरून तिला फैलावर घेतो. म्हणजेच प्रत्येकवेळी काही ना काही कारणावरून प्रियंकाला कायम सलमानच्या निशाण्यावर राहिली. पण 21 जानेवारीच्या एपिसोडमध्ये वेगळंच काही पाहायला मिळालं.

प्रियंकाचा क्लास घेण्याआधी सलमान प्रियंकावर कौतुकाचा वर्षाव करताना दिसला. खरं तर प्रियंकाचा क्लास घेण्यासाठी मोठा मुद्दा होता. मुद्दा होता टीना दत्ताचा. टीना शालीनबद्दल लज्जास्पद गोष्टी सांगत असताना प्रियंका तिला खोदून खोदून विचारत होती. टीना नकार देत असतानाही प्रियंका तिच्यावर दबाव टाकत होती. शालीन तुझ्याबद्दल इतकं काही बोलला तर तू का लपवत आहेस, तू पण बोलायला हवं, असं म्हणत प्रियंका टीनाला बोलण्यासाठी आग्रह करत होती. अशावेळी सलमान प्रियंकाचा क्लास घेऊ शकला असता. शो अखेरच्या टप्प्यात असताना तू अशा गोष्टी का समोर आणू इच्छित आहेस, असा प्रश्न तो विचारू शकला असता. पण सलमानने असं काहीही न करता प्रियंकाचं कौतुक सुरू केलं.

भविष्यात प्रियंकाला माझ्या सिनेमात घ्यायला मला आवडेल. ती हिरोईन मटेरिअल आहे, असं तो म्हणाला.तू सिनेमा बनलास तर प्रियंकाला घेणार का, असा प्रश्न सलमानने साजिद खानला विचारला. यावर मी तिला एक्स्टामध्ये ठेवेल, असं साजिद म्हणाला. यावर तिला एक्स्ट्रामध्ये ठेवावं, असं मला वाटत नाही, असं सलमान म्हणाला. यानंतर सलमानच्या म्हणण्यावरून साजिदने प्रियंकाला लीड म्हणून घेण्याचं वचन दिलं.

एकंदर काय तर सलमान पूर्णपणे प्रियंकाच्या प्रेमात दिसला. यावरून प्रियंकाच या सीझनची विनर होणार, असं मानलं जात आहे. The Khabri ने सुद्धा त्याच्या अंदाजामध्ये प्रियंकाला 'बिग बॉस 16' चा विजेता म्हटले आहे. ट्विटमध्ये दावा करण्यात आला की, प्रियंका चाहर चौधरी 'बिग बॉस 16' जिंकणार आहे. तसेच हे ट्विट सेव्ह करून स्क्रीनशॉट घेऊन ठेवा, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला आहे. अनेक फॅन्स क्लबनीसुद्धा प्रियंकाला विजेता म्हटलं आहे. सोशल मीडिया ट्रेंडनुसार प्रियंकाचं नाव सर्वात आघाडीवर आहे.

टॅग्स :बिग बॉससलमान खानटिव्ही कलाकारकलर्स