Join us  

ट्रक ड्रायव्हरने प्रसिद्ध अभिनेत्रीचं केलेलं अपहरण, म्हणाली, "किडनॅप करुन त्याने मला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 08, 2023 3:26 PM

"आइसक्रिम देतो सांगून त्याने मला किडनॅप केलं आणि...", 'बिग बॉस' फेम अभिनेत्रीने सांगितला 'तो' प्रसंग

'बिग बॉस १६' या रिएलिटी शोमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे सौंदर्या शर्मा. सौंदर्या बिग बॉसच्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक होती. तिने अनेक चित्रपटांतही काम केलं आहे. बालपणी सौंदर्याचं अपहरण करण्यात आलं होतं. अभिनेत्रीने एका मुलाखतीत तिच्या बालपणीचा हा प्रसंग सांगितला आहे. 

सौंदर्या म्हणाली, "आमच्या जवळच एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे. मी तिथून बाहेर जात होते. तिथे रोज एक ट्रक ड्रायव्हर यायचा आणि मला बघायचा. त्याने आइसक्रीम देतो असं सांगून माझं अपहरण केलं होतं. माझ्या बहिणीला मी कुठेतरी गेले असं वाटलं होतं. पण, नंतर तिच्या लक्षात आलं की तो ट्रक ड्रायव्हर रोज तिथे यायचा. त्यानंतर माझ्या कुटुंबीयांनी शोध घेतला. तो प्रसंग फारच भीतीदायक होतो." 

पायाला जखम झालेली असतानाही अजय पूरकर यांनी केलं शूटिंग, दिग्दर्शक म्हणाले, "सेटवर रक्ताच्या थारोळ्या..."

"मी याबाबत माझ्या आईवडिलांना कधी सांगितलं नव्हतं. त्यामुळे या प्रसंगानंतर त्यांनी माझी चिंता वाटू लागली होती. मी खूप धाडसी आहे. मी अशा प्रसंगांना सामोरे गेले आहे," असंही सौंदर्या म्हणाली. 

"माझी लाडकी प्राजक्ता...", 'राणी' म्हणत अमृता खानविलकरने प्राजक्ता माळीला दिल्या हटके शुभेच्छा

सौंदर्या अनेक म्युझिक व्हिडिओजमध्येही झळकली आहे. तिने 'रक्तांचल २', 'कंट्री माफिया' आणि 'कर्म युद्ध' या वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. परंतु, बिग बॉस हिंदीमुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. बिग बॉसच्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी सौंदर्या एक होती. 

टॅग्स :बिग बॉससौंदर्या शर्मा