Join us
Daily Top 2Weekly Top 5

सौंदर्या 'त्रिकुटा'सोबत झळकणार; शाहरुख, अजय, अक्षयसोबत एकत्र स्क्रिन शेअर करणारी पहिली अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 18:05 IST

सौंदर्या बिग बॉसच्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक होती.

'बिग बॉस १६' या रिएलिटी शोमधून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे सौंदर्या शर्मा. सौंदर्या बिग बॉसच्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी एक होती. तिने अनेक चित्रपटांतही काम केलं आहे. सुपरस्टार शाहरुख खान अजय देवगण आणि अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणारी पहिली अभिनेत्री ठरली आहे.त्यामुळे डिंपल डॉल सौंदर्या शर्माची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

बॉलिवूडचे तीन सुपरस्टार्स अर्थात अभिनेता शाहरुख खान, अजय देवगण आणि अक्षय कुमार या सर्वांसोबत एका जाहिरातीसाठी सौंदर्या शर्माने स्क्रिन शेअर केली आहे. तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिला मिळालेली ही सुवर्णसंधी ही केवळ तिचे टॅलेंट, चाहत्यांचे प्रेम यांच्यामुळेच मिळाली असल्याचे ती सांगते. सौंदर्या शर्माने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत ही आनंदाची बातमी दिली. यात तिने लिहिले, 'बी टाऊन मधून या सर्व सुपरस्टार्ससोबत काम करण्याची संधी मिळणे ही काही सोपी गोष्ट नव्हती. ती एक जबाबदारी आहे. सर्वांचे प्रेम आणि मिळालेल्या आशीर्वादाबद्दल मी कायम ऋणी राहीन. सोशल मीडियावरील तिच्या चाहत्यांच्या फॅन पेजवर तिचे क्यूट मीम्स, फोटो, व्हिडीओ हे व्हायरल झालेत.

 सौंदर्याच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर ती अनेक म्युझिक व्हिडिओमध्ये झळकली आहे. तिने 'रक्तांचल २', 'कंट्री माफिया' आणि 'कर्म युद्ध' या वेब सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. पण बिग बॉस हिंदीमुळे तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. बिग बॉसच्या घरातील चर्चेतील चेहऱ्यांपैकी सौंदर्या एक होती. 

टॅग्स :टिव्ही कलाकारबिग बॉस