Join us
Daily Top 2Weekly Top 5

बिग बी-अक्कीकडून सोनाचे कौतुक ?

By admin | Updated: August 7, 2016 02:29 IST

सो नाक्षी सिन्हा ही खरेच खूप टॅलेंटेड हीरोईन आहे. तिने नुकतेच तिच्या आवाजात ‘अकिरा’ या चित्रपटातील गाणे रेकॉर्ड केले आहे, तसेच तिचे टॅलेंट एवढ्यावरच थांबत नाही

सो नाक्षी सिन्हा ही खरेच खूप टॅलेंटेड हीरोईन आहे. तिने नुकतेच तिच्या आवाजात ‘अकिरा’ या चित्रपटातील गाणे रेकॉर्ड केले आहे, तसेच तिचे टॅलेंट एवढ्यावरच थांबत नाही, तर तिने एक सुंदरसे चित्रदेखील रेखाटले आहे. ‘फोर्स २’ मधील या अभिनेत्री सोनाक्षीने आर्ट स्टुडिओत काही चित्रे रेखाटली आहेत. विशेष म्हणजे, या चित्रांचा वापर ती चॅरिटीसाठी करणार आहे. बिग बी यांना कलावंताचा फार आदर वाटतो. त्यामुळे त्यांनी सोनाक्षीचे चित्र पाहिले आणि ट्विटरवर तिच्या कलेचे कौतुक केले. केवळ बिग बी नव्हे, तर अक्षय कुमार यानेही तिच्या चित्राचे प्रचंड कौतुक केले. मग काय? दोन मोठ्या कलावंतानी सोनाचे कौतुक केले म्हटल्यास, तिचे पाय जमिनीवर असणार आहेत का?