रणवीर सिंग व वाणी कपूर यांच्या मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर अलीकडे पॅरिसच्या आयफेल टॉवरवर रिलीज करण्यात आला. हा ट्रेलर रिलीज झाल्यानंतर केवळ 24 तासांत तो एक कोटी लोकांनी पाहिल्याचा दावा करण्यात येत आहे. विशेष म्हणजे ही आकडेवारी फक्त व्टिटरची असल्याचे सांगण्यात येत आहे. बऱ्याच वर्षांनंतर आदित्य चोप्रा यांनी दिग्दर्शनात कमबॅक केलेले आहे. ‘बेफिक्रे’च्या प्रमोशनमध्ये कुठलीही कमतरता राहू नये, हाच त्यांचा प्रयत्न आहे. यामुळेच त्यांनी ट्रेलर रिलीजसाठी आयफेल टावरची निवड केली. रणवीर व वाणीच्या चित्रपटातील किसिंग सीन्सची चर्चा घडवून आणली आणि आता ‘बेफिक्रे’ ट्रेलर 24 तासांत एक कोटी लोकांनी पाहिल्याचा दावा केला गेला. येत्या दिवसांत ‘बेफिक्रे’च्या प्रमोशनसाठी आणखी काय काय केले जाते, तेही बघूच.
‘बेफिक्रे’ झाला कोट्यधीश!
By admin | Updated: October 15, 2016 06:11 IST