Join us
Daily Top 2Weekly Top 5

भूषण-प्राजक्ताचे रोमँटिक साँग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2017 02:52 IST

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनोख्या जोड्या कोणत्या ना कोणत्या मार्गाने पाहायला मिळतात. आता हेच पाहा ना, अभिनेता भूषण प्रधान आणि प्राजक्ता माळी

सध्या मराठी चित्रपटसृष्टीत अनोख्या जोड्या कोणत्या ना कोणत्या मार्गाने पाहायला मिळतात. आता हेच पाहा ना, अभिनेता भूषण प्रधान आणि प्राजक्ता माळी अशी ही अनोखी जोडी प्रेक्षकांना एका रोमँटिक साँगच्या माध्यमातून दिसणार आहे. या जोडीवर चित्रीकरण करण्यात आलेले हे साँग सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या गाण्याला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसंती मिळताना दिसत आहे. या जोडीचे हे रोमँटिक गाणे प्रेमी युगुलांना त्यांच्या पहिल्या भेटीची आठवण करून देणारे आहे. रिचमंड एंटरटेन्मेंट प्रस्तुत ‘फिलिंग्स’ या म्युझिकल अल्बममधले हे गाणे आहे. या गाण्याला स्वप्निल बांदोडकर यांनी स्वर साज चढविले आहेत, तर या गाण्यांचे किरण खोत यांनी दिग्दर्शन केले आहे. या गाण्याच्या निमित्ताने भूषण प्रधान आणि प्राजक्ता माळी हे दोन कलाकार पहिल्यांदाच एकत्रित आले आहेत. त्यामुळे ही जोडी सोशल मीडियावर हीट होत असल्याचे दिसत आहे.