Join us

भूषण प्रधान-भूमी पेडणेकर एकत्र

By admin | Updated: July 28, 2016 02:10 IST

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता भूषण प्रधान हा अभिनेत्री भूमी पेडणेकरसोबत एका जाहिरातीत झळकणार असल्याचे भूषणने ‘लोकमत सीएनएक्स’शी बोलताना

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता भूषण प्रधान हा अभिनेत्री भूमी पेडणेकरसोबत एका जाहिरातीत झळकणार असल्याचे भूषणने ‘लोकमत सीएनएक्स’शी बोलताना सांगितले. या जाहिरातीविषयी बोलताना भूषण म्हणाला, ही जाहिरातीचे दिग्दर्शन बॉलिवूडचे तगडे दिगदर्शक अमित शर्मा यांनी केले आहे. अमित यांनी बॉलिवूडला तेवर हा सुपरहीट चित्रपट दिला आहे. बालिवूडच्या या तगडया दिग्दर्शकासोबत जाहिरात करण्यास मिळणे ही माज्यासाठी आनंदाची गोष्ट आहे. तसेच या दिग्दर्शकासोबत ३० सेकंद काम करण्यास मिळणे हे देखील तितकेच भाग्य आहे. या दिग्दर्शकाची शूट करण्याची स्टाइल ही कुठेतरी वेगळी जाणविली. तसेच पूर्वीपेक्षा आताच्या जाहिराती खूप बदलल्या आहेत. त्या तशाच टिपिकल राहिल्या नाहीत. तर अभिनेत्री भूमीविषयी बोलताना भूषण म्हणाला, ‘दम लगाकर हईशा’ या चित्रपटात भूमी शरीराने स्थूल दाखविण्यात आली होती. पण आता ती खूप फीट दिसत आहे. आणि एकदम छान ही दिसतेय. तिच्यासोबत काम करण्यात मजा आली. या जाहिरातीत माझी व भूमीची केमेस्ट्री खूप छान दाखविण्यात आली आहे. या जाहिरातीच्या ३० सेकंदांत देखील प्रॉडक्शनच्या लोकांनी आमचे कौतुक केले. सर्वाना स्क्रीनवरची आमची जोडी फार आवडली. चला तर भूषण व भूमीची ही केमेस्ट्री पाहण्यासाठी आपल्याला निदान दोन आठवडे तरी वाट पाहायला लागणार आहे.

- benzeerjamadar@lokmat.com