Join us

भूषण प्रधान करणार साऊथमधल्या प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटरच्या पत्नीशी रोमान्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 16:42 IST

मराठी सिनेमात कलाकारांच्या जोड्यांवर अनेक प्रयोग होत असतात.

मराठी सिनेमात कलाकारांच्या जोड्यांवर अनेक प्रयोग होत असतात. असाच एक प्रयोग अजिंक्य सिनेमात पाहायला मिळणार आहे. अभिनेता भूषण प्रधान आणि अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आपल्याला पहिल्यांदा प्रमुख भूमिकेत एकत्र दिसणार आहेत. २० मार्च २०२० रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या सिनेमात अभिनेता भुषण प्रधान म्हणजेच ‘अजिंक्य’ एका महत्त्वाकांक्षी तरुणाची भूमिका साकारत आहे. सिनेमाचं लेखन दिग्दर्शन अ. कदिर यांनी केलं आहे. तसेच सिनेमाचं संगीत रोहन-रोहन या प्रसिद्ध संगीतकार जोडगोळीने केलं आहे. 

याबाबत अभिनेता भूषण म्हणतो, सिनेमातील अजिंक्यच्या आयुष्यात त्याचं ध्येय ठरलेलं आणि ते मिळवण्यासाठी तो अफाट मेहनत घेत दिसतो. त्याच्या यशाबाबतच्या संकल्पना स्पष्ट आहेत. त्यामुळे ध्येयापर्यंत कसं पोहोचायचं त्याला नक्कीच माहिती आहे पण त्यासाठी तो कोणत्याही शॉर्टकटचा अवलंब करत नाही. व्यावहारिक आणि वस्तुनिष्ठ जीवन जगताना त्याच्या वैयक्तिक अशा काही घटना घडतात की ज्यामुळे त्याची आणि प्रेक्षकांचीही दृष्टी बदलणारा अजिंक्य हा सिनेमा आहे. अजिंक्य हा रोमॅंटिक सिनेमा देखील आहे. 

अजिंक्यची प्रियसी रितिकाच्या भूमिकेत अभिनेत्री प्रार्थना बेहेरे आहे. सिनेमातील ''अलगद अलगद..'' गाण्यातील आमची रोमॅंटिक केमिस्ट्री छान जुळून आली आहे त्यामुळे सिनेमात जिवंतपणा अधिक वाढल्याचंही तो सांगतो.  प्रार्थनाचा पती अभिषेक जावकर हा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध डिस्ट्रीब्युटर आहे. त्याने काही चित्रपटाचे दिग्दर्शनदेखील केले आहे. 'डब्बा एैस पैस', 'सॉल्ट आणि प्रेम' यांसारख्या मराठी चित्रपटांची त्याने सहनिर्मिती देखील केली आहे.

टॅग्स :भुषण प्रधानप्रार्थना बेहरे