Join us  

रिचा चड्ढा 'ह्या' सिनेमात करणार बेली डान्स

By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2018 12:12 PM

अभिनेत्री रिचा चड्ढा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अडल्ट स्टार शकीलाच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

ठळक मुद्देरिचा गिरवतेय बेली डान्सचे धडेरिचा चड्ढा साकारणार अभिनेत्री शकीलाची भूमिका

अभिनेत्री रिचा चड्ढा दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अडल्ट स्टार शकीलाच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटासाठी सध्या ती बेली डान्सचे प्रशिक्षण घेत आहे. दाक्षिणात्य ग्लॅमरस अभिनेत्री शकिला हिच्या चरित्रपटात ती हा खास नत्य प्रकार सादर करणार आहे. या भूमिकेसाठी सध्या ती खूप मेहनत घेते आहे. 

रिचा चड्ढा शायना लेबना यांच्या मार्गदर्शनखाली रिचा बेली डान्ससाठीचे धडे गिरवत आहे. गेली तीन आठवडे ती प्रशिक्षण घेत असून अजूनही काही आठवडे ती यासाठी मेहनत करणार आहे. रिचा चढ्ढा पहिल्यांदाच पडद्यावर बेली डान्स करताना दिसणार आहे.  तीन वर्षापूर्वी तिने या डान्सचे प्राथमिक धडे गिरवले होते. या चित्रपटाचे दिग्दर्शन इंद्रजीत लंकेश करीत आहेत.अॅडल्ट सिनेमांमधून लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेल्या शकीलाने वयाच्या २०व्या वर्षी १९९५ साली आलेल्या प्लेगर्ल्स या पॉर्न सिनेमातून आपल्या अभिनयाची सुरुवात केली होती.याच शकीलाचे वादग्रस्त आत्मचरित्रही प्रसिद्ध झाले होते. यांत शकीलाने अनेक धक्कादायक गौप्यस्फोट आणि खुलासे केले होते. तिचे हेच खुलासे आता सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर येणार आहेत. आपल्या आईने जीवन उद्धवस्त केल्याचा धक्कादायक गौप्यस्फोट शकीलाने यांत केला होता. आईच्या परवानगीने एका व्यक्तीने बलात्कार केला होता. त्या मोबदल्यात आईला त्याने पैसे दिले होते असा खुलासा तिने या आत्मचरित्रात केला आहे.सिल्क स्मिता शकीलाची आदर्श आहे. शकीलाचे नाव अनेक दिग्दर्शक आणि कलाकारांशीही जोडलं गेले. तिच्या अफेअरच्या चर्चाही रंगल्या, मात्र ती अविवाहितच राहिली. तिचा हाच जीवनपट रुपेरी पडद्यावर रसिकांना पाहायला मिळणार आहे. 

टॅग्स :रिचा चड्डाशकीला बायोपिक