Join us

‘बाजी’ने जिंकली मने

By admin | Updated: February 14, 2015 23:04 IST

प्रेक्षकांना भावेल अशी कथा, वेगवान मांडणी, जबरदस्त अ‍ॅक्शन आणि कसदार अभिनय यामुळे ‘बाजी’ चित्रपटाने प्रेक्षकांसह समीक्षकांची मने जिंकण्यात ‘बाजी’ मारली आहे.

प्रेक्षकांना भावेल अशी कथा, वेगवान मांडणी, जबरदस्त अ‍ॅक्शन आणि कसदार अभिनय यामुळे ‘बाजी’ चित्रपटाने प्रेक्षकांसह समीक्षकांची मने जिंकण्यात ‘बाजी’ मारली आहे. श्रेयस तळपदे, जितेंद्र जोशी आणि अमृता खानविलकर या त्रिकुटाने चित्रपटाला एका वेगळ््या उंचीवर नेऊन ठेवले आहे. हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांनाही मागे टाकेल अशी ही भव्य कलाकृती सर्वांच्याच पसंतीस पडत आहे. मराठीतला पहिला अ‍ॅक्शनपट आणि सुपर हीरो फिल्म असे समीकरण चित्रपटात चपखलपणे जुळून आले आहे. ‘माझा बाजी’ या गाण्याच्या वेळी किंवा चालत्या ट्रेनवरील क्लायमॅक्स आणि इतर अनेक प्रसंगांमध्ये दिग्दर्शकाच्या डोक्यातील कल्पना अ‍ॅक्शन डायरेक्टर सेल्वा यांनी प्रत्यक्षात साकारल्या असल्याने दाक्षिणात्य चित्रपटांचा फील आल्याशिवाय राहत नाही. म्हणूनच हा चित्रपट सर्वांच्याच कौतुकास पात्र ठरत आहे. चित्रपटाचे संगीत हा अजून एक प्लस पॉइंट ठरला आहे. या चित्रपटाला संगीत दिले आहे ते संगीतकार अतिफ अफजल यांनी. चिन्मयी श्रीपदा, आदर्श शिंदे, बेला शेंडे, शाल्मली खोलगडे आणि अभिजित सावंत यांच्या आवाजातील गाणी श्रवणीय झाली आहेत.