Join us

'बाहुबली २' च्या प्रदर्शनाची तारीख ठरली!

By admin | Updated: August 5, 2016 20:04 IST

कटप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पुढील वर्षी मिळणार आहे. बाहुबली या बहुचर्चित चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे. बाहुबली : द कन्लूजन या नावाने

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ०५ - कटप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाचे उत्तर आपल्याला पुढील वर्षी मिळणार आहे. बाहुबली या बहुचर्चित चित्रपटाचा सिक्वेल येणार आहे.  बाहुबली : द कन्लूजन या नावाने हा चित्रपट असून २८ एप्रिल २०१७ ला प्रदर्शित होणार आहे.
बाहुबली हा चित्रपट २०१४ मध्ये प्रदर्शित झाला होता. त्यावेळी ह्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धूमाकूळ घातल जोरदार कमाई केली होती. प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी ५० कोटींचा गल्ला जमवला होता. 
बाहुबली चित्रपटामध्ये काही सस्पेन्स ठेवण्यात आले होते. ते सस्पेन्स आता बाहुबली -२ प्रदर्शित झाल्यावरच प्रेक्षकांना पहायला मिऴणार आहेत. उदा. कटप्पाने बाहुबलीला का मारले? या प्रश्नाचे उत्तर ही आपल्याला मिळणार आहे. 
अर्का मिडिया वर्क्‍सच्या बॅनरखाली बाहुबली -२ या चित्रपटाची निर्मिती होणार असून यामध्ये अभिनेता प्रभास, राणा डग्गुबाती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटिया प्रमुख भुमिकेत दिसणार आहेत. तर चित्रपटाचे दिग्दर्शन एस.एस.राजमौली करणार आहेत.