Join us  

शाहरुखनंतर वरुण धवनसोबत येतोय Atlee चा सिनेमा, शूट पूर्ण होण्याआधीच रिलीज डेट पोस्टपोन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 08, 2023 5:49 PM

वरुण धवन अॅटली कुमारसोबत काम करण्यासाठी खूपच उत्सुक आहे.

शाहरुख खानचा 'जवान' सिनेमाने जगभरात धुमाकूळ घातला होता. साऊथचा प्रसिद्ध दिग्दर्शक अॅटली कुमारचा (Atlee Kumar) हा सिनेमा होता. आता अॅटली नवीन बॉलिवूड सिनेमाच्या तयारीसाठी लागला आहे. यामध्ये वरुण धवन (Varun Dhawan) मुख्य भूमिकेत असणार आहे. 'वीडी 18' (VD 18) असं सिनेमाचं नाव आहे. सिनेमाचं शूट सुरु झाल्याचं कळताच सर्वांचे चेहरे उजळले असतानाच आता नवीन अपडेट समोर आलंय. सिनेमाची रिलीज डेट पोस्टपोन करण्यात आली आहे.

वरुण धवन अॅटली कुमारसोबत काम करण्यासाठी खूपच उत्सुक आहे. तसंच यामध्ये तो पहिल्यांदाच पोलिसांच्या वर्दीत दिसणार आहे. वीडी 18 ची शूटिंग सुरु होताच वरुण धवन जखमी झाल्याची चर्चा होती. आता रिलीज डेटच्या या अपडेटमुळे चाहते काहीसे निराश झालेत. रिलीज डेट पुढे ढकलल्याने शूटिंगला लागलेला ब्रेकही आणखी काही काळ तसाच राहणार आहे. 

कलीसच्या दिग्दर्शनाखाली बनणारा हा सिनेमा अॅटली कुमारच्या प्रोडक्शन अंतर्गत असणार आहे. ही एक अॅक्शन फिल्म आहे. अॅटली या सिनेमाबाबतीत कोणतीच कसर सोडणार नाही हे नक्की. सिनेमाबाबतीत प्रत्येक छोट्यात छोटी गोष्ट ध्यानात ठेवली जात आहे. आधी शूट डिसेंबर महिन्यात पूर्ण होणार होते. मात्र आता होत असलेला उशीर पाहता सिनेमा पोस्टपोन करण्यात येत आहे. पुढील वर्षाच्या शेवटी सिनेमा रिलीज होईल अशी आशा आहे. यामध्ये वरुणसह वामिका गब्बी आणि कीर्ती सुरेशही मुख्य भूमिकेत आहेत.

टॅग्स :वरूण धवनबॉलिवूडसिनेमा