Join us  

लग्नाला काही दिवस असतानाच मोडणार होतं आस्ताद-स्वप्नालीचं लग्न, 'त्या' रात्री नेमकं काय घडलं होतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 5:53 PM

Aastad Kale -Swapnali Patil : जवळपास दीड वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर आस्ताद काळे आणि स्वप्नाली पाटील यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनी १४ फेब्रुवारी, २०२१ रोजी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली.

अभिनेता आस्ताद काळे (Aastad Kale) आणि अभिनेत्री स्वप्नाली पाटील (Swapnali Patil) हे मराठी सिनेइंंडस्ट्रीतील लोकप्रिय कपल्सपैकी एक आहेत. खरेतर या दोघांची पहिली भेट एका मालिकेच्या पायलट एपिसोड शूटवेळी झाली होती. त्यात ते दोघे बहिण भाऊ होते. त्यानंतर तीन-चार वर्षांनी दोघांनी पुढचं पाऊल मालिकेत काम केले. या मालिकेत स्वप्नालीची एंट्री झाली. हळूहळू दोघांची मैत्री झाली आणि काही महिन्यात आस्ताद स्वप्नालीच्या प्रेमात पडला. जवळपास दीड वर्षे लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्या दोघांनी १४ फेब्रुवारी, २०२१ रोजी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्नगाठ बांधली. 

खरेतर लग्न ठरल्यानंतर ते मोडणार होते, हे खुद्द लोकमत फिल्मीच्या लव्ह, गेम, लोचा या शोमध्ये स्वप्नालीने सांगितले. लग्नात झालेल्या लोच्यांबद्दल सांगताना स्वप्नाली पाटील म्हणाली की, आमच्या लग्नात आस्तादमुळे लोचे झालेत. त्यामुळे आमचं लग्नदेखील मोडणार होतं. आमच्यात वाद झालेत. आम्ही आई वडिलांना भेटवायला नेलं. त्यावेळी त्यांनी आमचं लग्न लावायचं ठरवलं. म्हणजे तारीख वगैरे काहीच ठरली नव्हती. एकदा आस्ताद घरी आला होता. माझी सटकली होती आणि त्यात आमच्यात वाद झाले होते. आम्ही दोघे छोटी पार्टी करु म्हणून बसलो होतो. स्वयंपाक पण केला होता. बोलता बोलता आमच्यात वाद झाले आणि माझी प्रचंड सटकली. मग थेट मी लग्न न करण्याचा निर्णय घेतला. 

लग्न करायचंच नाही, या निर्णयावर स्वप्नाली ठाम होती  

मग आस्ताद म्हणाला की, तिची सटकली तर मी शांत बसायला पाहिजे. तर मी पण संतापलो होतो. मग स्वप्नाली आणखी भडकली आणि घर सोडून निघून गेली. रात्रीचे १ वाजले होते. स्वप्नाली पुढे म्हणाली की, आस्तादने माझ्या बहिणीला फोन केला. ती युएसमध्ये असते. ती माझ्याबाबतीत खूप प्रोटेक्टिव्ह आहे. तिने शाल्मलीला फोन केला. तिने शाल्मलीला सांगितलं की, स्वप्नाली घर सोडून गेलीय. तर ती कुठे गेलीय बघ. मग शाल्मलीने मला फोन केला आणि विचारलं की, तू कुठे आहेस? गुपचूप घरी ये. मग मी तिच्या घरी गेले. मी खूप डिस्ट्रब होते. तोपर्यंत बहिणीने माझ्या भावाला फोन केला होता. तो घाटकोपरवरुन शाल्मलीच्या घरी पोहचला. मग त्याने सगळं विचारलं. आस्तादमध्ये सुधारणा होणार नाही. म्हणून मी लग्न करायचंच नाही, अशा निर्णयावर ठाम होते.  

दोघांनी नात्याला एक चान्स देण्याचा घेतला निर्णय

दुसऱ्या दिवशी स्वप्नाली सामान घेऊन घरातून निघून गेली. आस्ताद तिला सॉरी म्हणाला. त्यानंतर त्या दोघांनी नात्याला एक चान्स देण्याचा निर्णय घेतला. काउंन्सलिंग केलं. मात्र नंतर स्वप्नालीच्या बहिणीला हा निर्णय पटला नाही. कारण त्याच रात्री कॉल कॉन्फरंसमध्ये आस्ताद आणि मी, आस्ताद बाबा आणि माझी ताई होती. त्यात आस्ताद खूप रागारागाने बोलत होता. त्यामुळे बहिण तिथून बोलत होती आणि बाबांचे म्हणणे होते की आता बोलून काहीच फायदा नाही. तुम्ही तुमचं निस्तरा. उद्या बोलू. त्यामुळे ताईदेखील नाराज झाली.

लग्नाला दोन दिवस होते. मी पुण्याला जाणार आहे आणि दुसऱ्या दिवशी लग्न आहे. आदल्या रात्रीपर्यंत मी रडत होते. ताईला माझा लग्न करण्याचा निर्णय पटला नाही आणि ती लग्नाला आलीदेखील नाही, असे स्वप्नालीने सांगितले.

टॅग्स :अस्ताद काळेस्वप्नाली पाटील