Join us  

रागाच्या भरात महेश भट्ट यांनी धक्के मारुन आशुतोष राणाला काढलं होतं सेटच्याबाहेर; त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2023 12:28 PM

Ashutosh rana: सुरुवातीच्या काळात आशुतोष राणा यांना अनेक वाईट प्रसंगांना सामोरं जावं लागलं.

बॉलिवूडचा सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणजे आशुतोष राणा (Ashutosh rana). नायकापेक्षा त्यांच्या खलनायिकी भूमिका विशेष गाजल्या. आजही संघर्ष सिनेमातील त्यांची लज्जा शंकर पांडे ही भूमिका आठवली की अनेकांच्या अंगावर काटा येतो. आशुतोष राणा हे आज कलाविश्वातील प्रतिष्ठित आणि लोकप्रिय कलाकार म्हणून ओळखले जातात. परंतु, एक काळ असा होता जेव्हा दिग्दर्शक महेश भट्ट (mahesh bhatt) यांनी चक्क धक्के मारुन आशुतोष राणा यांना बाहेर काढलं होतं.

आशुतोष राणा आज त्यांचा ५६ वा वाढदिवस साजरा करत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी निगडीत अनेक गोष्टी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्येच महेश भट्ट यांनी आशुतोष राणा यांना दिलेल्या चुकीच्या वागणुकीची चर्चा रंगली आहे.आशुतोष राणा उत्तम अभिनेता असण्यासोबतच एक चांगले निवेदक, साहित्याची जाण असलेले जाणकारही आहेत. परंतु, करिअरच्या सुरुवातीला त्यांना अनेकदा वाईट वागणूक देण्यात आली.

करिअरच्या सुरुवातीला आशुतोष राणा, महेश भट्ट यांच्या शूटिंगच्या सेटवर काम मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी महेश भट्ट यांना पाहताच आशुतोष यांनी पटकन त्यांच्या पायांना स्पर्श केला आणि नमस्कार केला. परंतु, त्यांची ही कृती महेश भट्ट यांना जराही आवडली नाही. त्यांनी ताबडतोब गार्डला सांगून आशुतोष यांना बाहेर काढायला सांगितलं. त्यानंतर पुन्हा एकदा महेश भट्ट आणि आशुतोष यांची भेट झाली. या भेटीत महेश भट्ट यांनी घडलेल्या प्रकाराविषयी विचारलं. तू

'माझ्या पायांना स्पर्श का केलास?' असा प्रश्न त्यांनी विचारला. त्यावर,' ते माझ्या संस्कारांमध्ये आहे आणि मी ते कधीच सोडू शकत नाही', असं उत्तर आशुतोष राणाने दिलं. विशेष म्हणजे त्यांचं हे उत्तर ऐकून महेश भट्ट यांनी आशुतोष यांना त्यांच्या सिनेमात काम करायची संधी दिली.

टॅग्स :आशुतोष राणामहेश भटबॉलिवूड