Join us
Daily Top 2Weekly Top 5

अभिषेकच्या सल्ल्याने ऐशचे कमबॅक

By admin | Updated: September 2, 2014 23:57 IST

निर्माते संजय गुप्ता यांनी खुलासा केला आहे, ‘जज्बा’ या चित्रपटातून ऐश्वर्या रॉय बच्चनचे कमबॅक करण्यामागे तिचा पती अभिषेक बच्चनची मोठी भूमिका आहे.

निर्माते संजय गुप्ता यांनी खुलासा केला आहे, ‘जज्बा’ या चित्रपटातून ऐश्वर्या रॉय बच्चनचे कमबॅक करण्यामागे तिचा पती अभिषेक बच्चनची मोठी भूमिका आहे. ऐश्वर्या पुढील वर्षाच्या सुरुवातीला या चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. हा चित्रपट साईन करण्यासाठी तिने अभिषेकचा सल्ला घेतल्याचे कळते. एका प्रोजेक्टबाबत अभिषेक आणि संजय गुप्ता यांच्यात चर्चा सुरू होती. गुप्तांनी त्याला एका परदेशी चित्रपटाचे अधिकार खरेदी केल्याचे सांगितले. गुप्तांनी सांगितले की, ‘अभिषेकला या चित्रपटाची कथा खूप आवडली, त्याने फिमेल लीडबाबत विचारले, तेव्हा मी त्याला ऐश्वर्याचे नाव सांगितले. त्याने मला स्क्रिप्टची कॉपी मागितली. एका आठवडय़ाने अभिषेकने मला कॉल केला आणि सांगितले की, ऐश या चित्रपटासाठी तयार आहे.’ त्यानंतर ऐश्वर्याने कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये ‘जज्बा’मधून कमबॅक करणार असल्याची घोषणा केली. चित्रपटात इरफान खानही मुख्य भूमिकेत आहे; पण ऐश्वर्या आणि इरफान यांच्यात कोणताही रोमान्स नसल्याचे गुप्तांनी स्पष्ट केले आहे. चित्रपटात जॉन अब्राहमचीही झलक पहायला मिळणार आहे.