Join us

अशोक-राधिकाचा ‘उला’ येतोय

By admin | Updated: July 28, 2016 02:18 IST

साउथमधील सुपरस्टार अशोक कुमार भट्टाचार्य त्याच्या अनोख्या स्टाईलमुळे साउथ इंडस्ट्रीमध्ये चांगलाच फेमस आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नशीब अजमाविण्यासाठी

साउथमधील सुपरस्टार अशोक कुमार भट्टाचार्य त्याच्या अनोख्या स्टाईलमुळे साउथ इंडस्ट्रीमध्ये चांगलाच फेमस आहे. मराठी चित्रपटसृष्टीत नशीब अजमाविण्यासाठी आता अशोक ‘डिस्को सन्या’ या चित्रपटाद्वारे पदार्पण करीत आहे. मूळचा महाराष्ट्रातील असलेला हा रांगडा हिरो साउथमधील अनेक चित्रपटांमध्ये झळकला आहे. आता, या डिस्को सन्या या चित्रपटानंतर अशोकचा राधिका आपटेसोबत उला नावाचा तामिळ चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. याच चित्रपटाच्या संदर्भात सीएनएक्सने अशोक कुमारसोबत संवाद साधला असता, त्याने या बातमीचा उलगडा केला. राधिका आपटेसोबत माझा उला नावाचा चित्रपट येणार आहे. या चित्रपटात मी लीड रोलमध्ये जरी असलो, तरी याला थोडी निगेटिव्ह शेड आहे. ‘उला’चा अर्थ होतो जर्नी. माझे कॅरेक्टर एका भूमिकेतून दुसऱ्या भूमिकेत जाताना दाखविले आहे. माझ्या कॅरेक्टरच्या शेड्सचा हा अनोखा प्रवास यात दाखविण्यात आला आहे. राधिकासोबत काम करण्याचा अनुभव खूपच छान होता. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले असून, लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. कबालीचा जोर पाहाता, आम्ही उला हा चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी थांबलो होतो, असे त्याने सांगितले. छान मराठी बोलणारा अशोक लवकरच डिस्को सन्यामध्ये आपल्याला एका विशेष भूमिकेमध्ये दिसणार आहे. तर उलाच्या प्रदर्शनानंतर साउथचा हा हँडसम हंक लीड रोलमध्ये मराठी चित्रपटातही प्रेक्षकांना लवकरच दिसू शकतो.

- priyankalondhe@lokmat.com