बॉलिवूडमधील काही गाजलेल्या सिनेमांपैकी एक म्हणजे १९९० साली प्रदर्शित झालेला 'आशिकी'. या सिनेमातील प्रेमकहाणी प्रचंड गाजली होती. राहुल रॉय आणि अनु अग्रवाल या सिनेमात मुख्य भूमिकेत होते. ही जोडी प्रचंड हिट ठरली होती. या सिनेमातील राहुल रॉयची हेअरस्टाइलचीही चर्चा रंगली होती. आता इतक्या वर्षांनी राहुलला स्पॉट करण्यात आलं आहे.
'इन्स्टंट' बॉलिवूड या इन्स्टाग्राम पेजवरुन राहुल रॉयचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये त्याचा बदललेला लूक पाहायला मिळत आहे. त्याने काळ्या रंगाचं शर्ट आणि खाकी पँट घातल्याचं दिसत आहे. इतक्या वर्षांनीही राहुल रॉयची हेअरस्टाइल मात्र बदललेली नाही. पण, या व्हिडिओत त्याचं पोट सुटलेलं दिसत आहे. या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.
'आशिकी' सिनेमाच्या सक्सेसनंतर याचा सीक्वलही प्रदर्शित करण्यात आला होता. 'आशिकी २' सिनेमात आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत आहेत. आता 'आशिकी ३'देखील लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यात कार्तिक आर्यन मुख्य भूमिकेत असणार आहे.