Join us
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ गायिका ​आशा भोसलेंचा स्टेज शोला अलविदा...

By admin | Updated: July 12, 2016 10:22 IST

गेल्या सहा दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या अष्टपैलू, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी 'स्टेज शो'ला अलविदा केला आहे.

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १२ -  गेल्या सहा दशकांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणा-या अष्टपैलू, ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी 'स्टेज शो'ला अलविदा केला आहे. वाढत्या वयामुले त्यांनी हा निर्णय घेतला आहे. मी आता ८३ वर्षांची झाले असून वयामुळे मला स्टेज शो करणं शक्य नाहीस असे आशा ताईंनी सांगितले. 
अलीकडेच वॉशिंग्टन येथे आशा ताईंचा शेवटचा स्टेज शो पार पडला.  स्टेज शो हा आपल्या आयुष्यातला शेवटचा शो होता, असे त्यांनी सांगितले. यापुढे मी देश वा परदेशात कुठेच स्टेज शो करणार नाही, असे त्यांनी जाहीर केले. सहा दशकांहून अधिकच्या कार्यकाळात आशाताईंनी ऑस्ट्रेलिया, न्यूजीलँड, दुबई, अमेरिका व लंडनसह जगभरात अनेक ठिकाणी स्टेज शो केले होते. यापुढे मात्र देश-विदेशातील रसिक श्रोत्यांना आशा दीदींना लाईव्ह ऐकता येणार नाही..
वयाच्या ८३ व्या वषीर्ही आशाजींच्या आवाजाची जादू तशीच कायम आहे, त्यामागचे रहस्यही आशा दींनी सांगितले. त्या म्हणाल्या, माझा आवाज सुरेल राहण्यासाठी मी रोज सकाळी शास्त्रीय संगीताचा अभ्यास व रियाज करते. तसेच उच्चांरासाठी मी सकाळी 'ओम' चे उच्चारण करते, असे त्यांनी सांगितले.