Join us  

स्टारडम! आर्यन खान दिग्दर्शित पहिलीच वेबसिरीज; बॉलिवूडच्या 'या' सुपरस्टारचा कॅमिओ रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2023 3:36 PM

दिग्दर्शक म्हणून हा आर्यन खानचा पहिलाच प्रोजेक्ट आहे.

शाहरुख खानचा (Shahrukh Khan) लाडका आर्यन खान (Aryan Khan) अभिनेता म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणून अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. 'स्टारडम' या वेबसिरीजच्या दिग्दर्शनाची धुरा तो सांभाळत आहे. टीव्ही अभिनेता लक्ष लालवानी सीरिजमध्ये मुख्य भूमिका साकारणार आहे. सहा भागांमध्ये ही सीरिज प्रदर्शित होणार असून अभिनेता रणबीर कपूरचा कॅमिओ असेल अशी शक्यता आहे. 

दिग्दर्शक म्हणून हा आर्यन खानचा पहिलाच प्रोजेक्ट आहे. यासाठी आर्यनने लिखाणापासून ते कास्टिंगपर्यंत सगळ्याच गोष्टींवर मेहनत घेतली आहे. त्याने या प्रोजेक्टसाठी बरंच संशोधन केलं आहे तसंच प्री प्रोडक्शनवरही काम केलं आहे. याचवर्षी सीरिज रिलीज होईल अशी अपेक्षा आहे.

काही दिवसांपूर्वीच रणबीर कपूर आर्यनच्या सेटवर पोहोचला होता. माध्यम रिपोर्ट्सनुसार, यावेळी रणबीरने आर्यनला प्रोत्साहन दिले आणि एक कॅमिओ देखील शूट केला.  ही सीरिज हिंदी सिनेमाच्या इतिहासावर आधारित आहे. रणबीरशिवाय या सिरीजमध्ये अनेकांचा कॅमिओ बघता येण्याची शक्यता आहे. करण जोहरही आर्यनच्या सेटवर पोहोचला होता. तर शाहरुख खानने पहिल्याच दिवशी लेकाला सरप्राईज दिले होते.

गेल्या वर्षीच आर्यनने स्क्रीप्टची एक झलक दाखवत प्रोजेक्टची घोषणा केली होती.शाहरुखचे रेड चिलीज एंटरटेन्मेंटच सीरिजची निर्मिती करणार आहे. यापूर्वीआ आर्यनने काही दिवसांपूर्वीच एका क्लोदिंग ब्रँडची जाहिरात केली होती. यामध्ये त्याने आपले वडील शाहरुख खानलाच घेतले होते.

टॅग्स :आर्यन खानरणबीर कपूरवेबसीरिज