Join us
Daily Top 2Weekly Top 5

आर्या म्हणते... जमाना सिंगल साँगचा

By admin | Updated: September 30, 2016 03:32 IST

सारेगमप लिटिल चॅम्प्समधून घराघरांत पोहोचलेली आर्या आंबेकरने एक हिंदी सोलो साँग गायले आहे. ‘कारे से’ असे या गाण्याचे बोल आहेत. आर्याने नुकतेच हे गाणं सोशल मीडियावर

सारेगमप लिटिल चॅम्प्समधून घराघरांत पोहोचलेली आर्या आंबेकरने एक हिंदी सोलो साँग गायले आहे. ‘कारे से’ असे या गाण्याचे बोल आहेत. आर्याने नुकतेच हे गाणं सोशल मीडियावर अपलोड केले आहे. या गाण्याविषयी ‘सीएनएक्स’शी बोलताना आर्या सांगते, याआधी मी हिंदी सोलो साँग गायिले आहे. त्याचबरोबर काही महिन्यांपूर्वी मी गायलेले मराठी सोलो सॉगदेखील रसिकांच्या पसंतीस उतरले आहे. हे गाणंदेखील नक्कीच रसिकांच्या पसंतीस पडेल, असा आर्याला विश्वास आहे. सध्या बॉलिवूड आणि मराठी चित्रपटसृष्टीत सोलो साँगची क्रेझ निर्माण झाली आहे. अशा गाण्यांना रसिकांचादेखील चांगला प्रतिसाद मिळतो आहे. तसंच सोशल मीडियाच्या माध्यमातून हे गाणं रसिकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते असल्याचेदेखील आर्याने सांगितले आहे.