Join us  

बस्स आणखी काय हवं..., हृतिकची एक्स-वाईफ सुजैन खानसोबतच्या अफेअरवर बोलला अर्सलन गोनी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 11:26 AM

अभिनेता हृतिक रोशनची पूर्वश्रमीची पत्नी सुजैन खान (Sussanne Khan) आणि अभिनेता अर्सलन गोनी ( Arslan Goni ) यांच्या डेटिंगच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. आता अर्सलनने सुजैनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

अभिनेता हृतिक रोशनची पूर्वश्रमीची पत्नी सुजैन खान (Sussanne Khan) आणि अभिनेता अर्सलन गोनी ( Arslan Goni ) यांच्या डेटिंगच्या चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहेत. पण व्हॅकेशनवर एकत्र जाण्यापासून पार्ट्या व लंच-डिनरपर्यंतचे दोघांचे फोटो बरंच काही सांगणारे आहेत.  सुजैन अद्याप यावर काहीही बोलायला तयार नाही. पण आता अर्सलनने सुजैनसोबतच्या अफेअरच्या चर्चांवर मौन सोडलं आहे.

अलीकडे सुजैन खानला कोरोनाच लागण झाली होती. कोरोना पॉझिटीव्ह आल्याची पोस्ट सुजैननं शेअर केली होती. तिच्या या पोस्टवर कमेंट करत अर्सलनने किस इमोजी शेअर केली होती. त्याची ही कमेंट बघून अनेकांनी सुजैन  व अर्सलन  रिलेशनशिपमध्ये असल्याचा अंदाज व्यक्त केला होता.

त्यानंतर पहिल्यांदा अर्सलन सुजैनसोबतच्या नात्यावर बोलला आहे. एका ताज्या मुलाखतीत तो म्हणाला,‘ मला लाईमलाइटमध्ये राहायला आवडत नाही. खरं तर पर्सनल लाईफबद्दल काहीही बोलायला मला आवडत नाही. मी अनेक दिवसांपासून चर्चा ऐकतोय. माझे काही मित्र मॅसेज करून मला याबद्दल विचारत आहेत. दोन व्यक्ती आनंदानं आयुष्य जगत आहेत. बस्स आणखी काय हवं.’

सुजैनच्या पोस्टवर ‘किस’ इमोजी पोस्ट केल्याबद्दल विचारलं असता तो म्हणाला, एखादी व्यक्ती कोरोना पॉझिटीव्ह आल्याची पोस्ट शेअर करत असेल तर मी त्यावर काय रिप्लाय द्यायला हवा होता? मी नेहमीच तिच्यासाठी (सुजैन)प्रार्थना करतो. ती लवकर बरी व्हावी, अशी मी प्रार्थना करतो. सोशल मीडियावर लोक काय बोलतात, काय म्हणतात याने मला काहीही फरक पडत नाही. सुजैन पॉझिटीव्ह आली आणि मी एक प्रेमळ कमेंट केली, इतकाच त्याचा अर्थ होता. हृतिक आणि सुजैनचा 2014 मध्ये घटस्फोट झाला. पण अद्यापही हृतिक व सुजैन दोघंही चांगले मित्र आहेत. मुलांसाठी ते दोघे नेहमी एकत्र येताना दिसतात. पण गेल्या काही दिवसांत सुजैन अर्सलानला डेट करत असल्याचं मानलं जातंय. अर्सलन हा ‘बिग बॉस 14’ फेम अली गोनीचा भाऊ आहे. तो एक अभिनेता आहे. 2017 साली ‘जिया और जिया’ या सिनेमाद्वारे त्याने बॉलिवूड डेब्यू केला होता. अर्सलन अल्ट बालाजीच्या ‘मैं हीरो बोल रहा हूं’ या सीरिजमध्येही दिसला होता.  

टॅग्स :सुजैन खानहृतिक रोशन