Join us  

अक्षय कुमार, संजय दत्त आणि अर्शद वारसी हे त्रिकूट पुन्हा घालणार धुमाकूळ 'वेलकम ३'मध्ये

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2023 4:19 PM

चाहते चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत.

2007 मध्ये रिलीज झालेला अक्षय कुमार, कतरिना कैफ, नाना पाटेकर आणि अनिल कपूर स्टारर चित्रपट 'वेलकम' बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. 2015 मध्ये वेलकमचा सिक्वेल 'वेलकम बॅक' रिलीज झाला होता, ज्यामध्ये अक्षय कुमारऐवजी अभिनेता जॉन अब्राहम मुख्य भूमिकेत दिसला होता आणि आता चाहते चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत आहेत. रिपोर्टनुसार निर्मात्यांनी 'वेलकम 3' बनवण्याची तयारी सुरू केली आहे. 

अभिनेता अर्शद वारसीने 'वेलकम 3' ला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले की, या चित्रपटात त्याच्याशिवाय अभिनेता अक्षय कुमार आणि संजय दत्त देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा एक लार्जर-दॅन-लाइफ चित्रपट आहे ज्याचा मी एक भाग होणार आहे. मी, अक्षय कुमार, संजय दत्त, परेश रावल आणि खूप काही सारे लोक यात आहेत.

अर्शद वारसी पुढे म्हणाला, "आता सिनेमाची संपूर्ण परिस्थिती बदलली आहे. आता थिएटरमध्ये प्रदर्शित होणारे सर्व चित्रपट सुपरहिरो आहेत. मी उत्सुक आहे. मोठ्या चित्रपटांमध्ये छोटी-मोठ्या भूमिका कारणं मला आवडतं नाही. . माझ्यासाठी कामातलं समाधान ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. काही असे चित्रपट आहेत जे मला भरपूर पैसे देतील. मला काही मिळालेल्या ऑफर्स आल्या पण त्या मला तितक्याशा आवडल्या नाहीत. आता मी वेलकम ३ मध्ये काम करतोय. 

वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, अभिनेता अर्शद वारसी सध्या त्याच्या 'असुर 2' या वेबसीरिजमुळे चर्चेत आहे. अर्शद वारसी, अनुप्रिया गोएंका, रिद्धी डोगरा आणि वरुण सोबती यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट १ जून रोजी जिओ सिनेमावर प्रदर्शित झाला. या मालिकेत अर्शद वारसी पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसत आहे. ही मालिका प्रेक्षकांना खूप आवडली असून अर्शद वारसीच्या भूमिकेचेही खूप कौतुक झाले आहे.

टॅग्स :अर्शद वारसीअक्षय कुमारसंजय दत्त