Join us  

आता जो येणार तो शैतान...; 'सिंघम अगेन'मधील अर्जुन कपूरचा रक्तरंजित लूक व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2024 10:00 AM

'सिंघम अगेन' मधील अर्जुन कपूरचा खुनशी लूक व्हायरल झालाय

रोहित शेट्टीच्या (Rohit Shetty) 'सिंघम अगेन' सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. 'सिंघम अगेन' मध्ये अजय देवगण प्रमुख भुमिकेत आहे. पुन्हा एकदा अजयचा (Ajay Devgn) बाजीराव सिंघम गुंडांशी दोन हात करायला सज्ज आहे. 'सिंघम अगेन' मध्ये यावेळी तगडी स्टारकास्ट आहे. रोहित शेट्टी सिनेमातील एकामागून एक कलाकारांची ओळख करुन देतोय.  अशातच रोहितने नुकतंच सिनेमातील खलनायक अर्थात अर्जुन कपूरचा (Arjun Kapoor) लूक सर्वांसमोर रिव्हिल केलाय. 

'सिंघम अगेन' मध्ये अर्जुन कपूर खलनायकी भूमिका साकारणार आहे. रोहित शेट्टीने त्याचा खुनशी लूक सर्वांसमोर आणलाय. चेहऱ्यावर रक्त, केस वाढलेले अशा भयंकर अवतारात अर्जुन कपूर दिसतोय. याशिवाय तो आणि रणवीर सिंग आमनेसामने आल्याचं पाहायला मिळतंय. 'इन्सान गलती करता है और उसे सजा भी मिलती है, लेकिन अब जो आएगा वै शैतान है', असं कॅप्शन देत अर्जुन कपूरचा लूक व्हायरल झालाय. 

'सिंघम अगेन' मध्ये अजय देवगण प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय सिनेमात टायगर श्रॉफ, दीपिका पादुकोण, रणवीर सिंग, करिना कपूर या कलाकारांची तगडी स्टारकास्ट दिसून येतेय. या सिनेमाचं दिग्दर्शन रोहित शेट्टीने केलं आहे. हा सिनेमा १५ ऑगस्ट २०२४ ला रिलीज होणार आहे.  

टॅग्स :अर्जुन कपूरदीपिका पादुकोणकरिना कपूरटायगर श्रॉफअजय देवगणरोहित शेट्टी