बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर (Arjun Kapoor) सध्या त्याच्या आगामी रोमँटिक कॉमेडी चित्रपट 'मेरे हसबंड की बीवी'(Mere Husband Ki Biwi)च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्याच्यासोबत भूमी पेडणेकर आणि रकुल प्रीत सिंग देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. यानंतर अर्जुन कपूर 'नो एंट्री २' या कॉमेडी चित्रपटात दिसणार आहे. वरुण धवन आणि दिलजीत दोसांझ देखील या चित्रपटात दिसणार आहेत. नुकतेच अर्जुनने 'नो एंट्री २' या चित्रपटाबद्दल सांगितले.
नुकतेच दिल्लीत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अर्जुन कपूरला त्याच्या 'नो एन्ट्री २' या चित्रपटाबद्दल विचारण्यात आले. त्यावेळी तो म्हणाला की, ''यासाठी अजून वेळ आहे, पण कॉमेडी हा एक प्रकार आहे जो प्रत्येकाला थिएटरमध्ये पाहायला आवडतो. कौटुंबिक प्रेक्षकांसाठी कॉमेडी हा अतिशय महत्त्वाचा प्रकार आहे, मग त्यात रोमान्स असो वा नाटक.'' अर्जुन पुढे म्हणाला, ''तुम्ही एकत्र बसून लोकांना हसवू शकत असाल तर यापेक्षा चांगली भावना नाही.''
लवकरच सुरू होणार 'नो एंट्री २'चं शूटिंग अर्जुन कपूरने सांगितले की, त्याने ॲक्शन, ड्रामा आणि काही कॉमेडी चित्रपट केले आहेत. अनीस बझ्मींसोबत 'मुबारकां'मध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला आणि आता पुन्हा एकदा दिग्दर्शकासोबत काम करण्याची संधी मिळत असल्याचे त्याने सांगितले. 'नो एन्ट्री २'चे शूटिंग लवकरच सुरू होईल, अशी आशा अर्जुनने व्यक्त केली. तो म्हणाला, 'जेव्हा मी अधिक तपशील देऊ शकेन तेव्हा देईन. पण हो, मेरे हसबंड की बीवी नंतर मी आणखी कॉमेडी चित्रपट करण्यास उत्सुक आहे.
'मेरे हसबंड की बीवी' रिलीजसाठी सज्जअर्जुन कपूरचा आगामी चित्रपट 'मेरे हसबंड की बीवी' २१ फेब्रुवारी २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. वाशू भगनानी यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे आणि दिग्दर्शक मुदस्सर अझीझ आहेत, ज्यांच्या दिग्दर्शनाखाली 'खेल खेल में' गेल्या वर्षी २०२४ मध्ये प्रदर्शित झाला होता.