Join us

अर्जुन कपूरच्या या सवयीला मलायकाही वैतागली! खुद्द बॉयफ्रेन्डनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2020 15:49 IST

अर्जुनची एक अशी सवय आहे जी मलायकाला अजिबात आवडत नाही.

ठळक मुद्देयाआधी लाइव्ह चॅट सेशनमध्ये अर्जुनने त्याच्या लव्ह लाइफबद्दल अनेक खुलासे केले होते.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन आहे़ साहजिकच सगळेच आपआपल्या घरात कैद आहे. अगदी बॉलिवूडचे सेलिब्रिटीसुद्धा. ऐरवी बॉलिवूडच्या या बड्या बड्या स्टार्सकडे क्षणाचीही उसंत नसते. पण सध्या त्यांच्याकडे वेळच वेळ आहे. अशात हे स्टार्स सोशल मीडियावर कधी नव्हे इतके अ‍ॅक्टिव्ह झाले आहेत. अर्जुन कपूर आणि त्याची गर्लफ्रेन्ड मलायका अरोरा हे दोघेही सोशल मीडियावर चांगलेच अ‍ॅक्टिव्ह दिसताहेत. एकीकडे मलायका वेगवेगळ्या रेसीपी व फिटनेस व्हिडीओ शेअर करतेय तर अर्जुन कपूर मलायकाच्या पोस्टवर कमेंट देतोय. पण कमेंट देता देता आता अर्जुनने एक मोठा खुलासाही केला आहे. होय, अर्जुन कपूरच्या एका सवयीला मलायका चांगलीच वैतागली आहे आणि खुद्द अर्जुनने याचा खुलासा केला आहे.

इन्स्टाग्रामवरील एक गेम टू डूच्या दरम्यान अर्जुन कपूरला एका युजरने ‘फोनचा वापर कमी कर’, असे लिहिले. त्याची ही पोस्ट आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर पोस्ट करत अर्जुनने असा काही खुलासा केला की, सगळ्यांनाच आश्चर्य वाटले. 

‘ फोनचा वापर ही माझी अशी सवय आहे जी मी सोडून द्यावी, असे आणखी एका व्यक्तिला वाटते. आज ती  व्यक्ती तुझ्याशी नक्की सहमत असेल,’ असे अर्जुनने लिहिले आणि या पोस्टमध्ये अर्जुनने मलायकाला टॅग केले. याचा अर्थ तुम्ही समजलाच असाल. सतत फोन राहणे ही अर्जुनची सवय मलायका आवडत नाही आणि त्याने ती सोडून द्यावे, असे मलायकाला वाटते.

याआधी बॉलिवूड हंगामाशी झालेल्या लाइव्ह चॅट सेशनमध्ये अर्जुनने त्याच्या लव्ह लाइफबद्दल अनेक खुलासे केले होते.   गर्लफ्रेंड मलायकाशी लग्नाबाबत तुझा काय प्लान आहे, या एका युजरच्या प्रश्नावर  अर्जुनने धम्माल उत्तर दिले होते़ ‘मी लग्न करेन तेव्हा तुम्हाला सर्वांना नक्की सांगेन. सध्या तरी काही प्लान नाही आहे आणि समजा असेलच तरीही आता कसं लग्न करणार? सध्या तरी लग्नाचा कोणताही प्लान नाही. पण जेव्हा लग्न करायचे असेल तर कोणापासून काहीही लपवणार नाही,’ असे तो म्हणाला होता.

टॅग्स :अर्जुन कपूरमलायका अरोरा