बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर व अभिनेत्री मलायका अरोरा सध्या कधी नव्हे इतके चर्चेत आहेत. जगाची पर्वा न करता दोघेही मुंबईच्या रस्त्यांवर, बॉलिवूडच्या पार्ट्यांमध्ये अगदी खुल्लम खुल्ला फिरताना दिसतात. यादरम्यान अर्जुन कायम मलायकाची काळजी घेताना दिसतो. अशात मलायकाला कुणाचा त्रास होत असेल तर अर्जुन गप्प कसा बसेल. अलीकडे नेमके हेच झाले.अर्जुन-मलायका मित्रांसोबत डिनर डेटवर निघाले. फोटोग्राफर्स जणू त्यांच्या मागावर असावेत. दोघेही एकत्र दिसताच,त्यांचे कॅमेरे सरसावलेत. याचदरम्यान फोटोग्राफर्सनी अजानतेपणी मलायकाचा रस्ता अडवून धरला. पापाराझींनी मलायकाचा रस्ता अडवलेला पाहून ऐरवी ‘कूल मार्इंडेड’ राहणारा अर्जुन कपूर भडकला. त्याने पापाराझींना चांगलेच फैलावर घेतले. मग काय, पापाराझींनी मलायकाचा मार्ग मोकळा केला आणि प्रकरण हाताबाहेर जाता जाता राहिले. यानंतर मलायका व अर्जुन दोघेही तिथून निघून गेलेत.
पापाराझींनी अडवला मलायका अरोराचा रस्ता! अर्जुन कपूर भडकला!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2019 10:15 IST
अर्जुन कायम मलायकाची काळजी घेताना दिसतो. अशात मलायकाला कुणाचा त्रास होत असेल तर अर्जुन गप्प कसा बसेल. अलीकडे नेमके हेच झाले.
पापाराझींनी अडवला मलायका अरोराचा रस्ता! अर्जुन कपूर भडकला!!
ठळक मुद्देअर्जुन कपूर सध्या आशुतोष गोवारीकर यांच्या ‘पानीपत’ या चित्रपटात बिझी आहे.