Join us
Daily Top 2Weekly Top 5

रोजच्या वाहतूक कोंडीला कंटाळून अभिनेत्रीची संतप्त पोस्ट, म्हणाली "मुली वाचवा, मुली शिकवा आणि मुलीला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 13:39 IST

प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने एक पोस्ट शेअर केली आहे. 

Apurva Nemlekar On Thane Traffic : ट्राफिकची समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढणारी गर्दी आणि त्यामुळे वाढणारं ट्राफिक ही आता रोजचीच अडचण झाली आहे. कामाच्या वेळी बऱ्याचदा वाहतुक कोडींमुळे सामान्य नागरिकांचा खोळंबा होता. पण केवळ सामान्य नागरिकांनाच नव्हे तर कलाविश्वातील सेलिब्रिटींनाही वाहतुकीच कोंडीचा सामना करावा लागतो. अनेकदा कलाकारांनी ट्राफिकबाबत सोशल मीडियावरुन भाष्य केलं आहे. इतर कलाकार आणि सामान्य नागरिकांप्रमाणेच प्रसिद्ध अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने एक पोस्ट शेअर केली आहे. 

अपूर्वा नेमळेकरनेही ठाण्यातील वाहतुक कोंडीमुळे त्रस्त आहे. अपूर्वाने इन्स्टाग्राम स्टोरीवर ट्रॅफिकचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोवर तिने "बेटी बचाओ, बेटी पढाओ और बेटी को ठाणे के ट्रॅफिकसे भी बचाओ", असं कॅप्शन दिलं. अपूर्वा ही सध्या ठाण्यात राहत असून शूटिंगनिमित्त ती ठाणे ते मुंबई असा प्रवास करते. मात्र या प्रवासात तिला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. याधाही तिने पोस्ट शेअर करत वाहतूक कोंडीवर संताप व्यक्त केला होता. 

अपूर्वा ही टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सध्या ती 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या मालिकेत  अपूर्वाने सावनी नावाचं पात्र साकारलं आहे. अपूर्वा सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. करिअरबरोबरच वैयक्तिक आयुष्यातील अपडेट्सही ती चाहत्यांना देत असते. अभिनयाबरोबरच अपूर्वा तिच्या बेधडक व्यक्तिमत्वासाठी ओळखली जाते. 

टॅग्स :अपूर्वा नेमळेकरमुंबईठाणेवाहतूक कोंडी