Join us

अनुष्काला मिळाले सर्टिफिकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2016 03:00 IST

सध्याचा काळ अनुष्का शर्मासाठी फार भरभराटीचा आहे. ‘सुल्तान’चे यश अनुभवल्यानंतर सध्या ती ‘फिलौरी’च्या रिलीज होण्याची वाट पाहते आहे. तसेच तिचा ‘ऐ दिल हैं मुश्किल’ हा चित्रपटही लवकरच रिलीज होणार आहे

सध्याचा काळ अनुष्का शर्मासाठी फार भरभराटीचा आहे. ‘सुल्तान’चे यश अनुभवल्यानंतर सध्या ती ‘फिलौरी’च्या रिलीज होण्याची वाट पाहते आहे. तसेच तिचा ‘ऐ दिल हैं मुश्किल’ हा चित्रपटही लवकरच रिलीज होणार आहे. करण जोहर दिग्दर्शित या चित्रपटात ऐश्वर्या रॉय बच्चन, रणबीर कपूर हेदेखील असतील. अनुष्काने नुकतीच चित्रपटाची शूटींग पूर्ण केली असून तिला ‘एडीएचएम टीम’कडून सर्टिफिकेटही मिळाले आहे. वेल, गोंधळून गेलात का? तर झालं असं की, चित्रपटाचे दिग्दर्शक संतोष सिंग यांना अनुष्काचे शूट रॅप-अप थोडेसे स्पेशल करायचे होते. म्हणून अनुष्काला त्यांनी एक छानसे सर्टिफिकेट दिले. तिने सर्टिफिकेटचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला आणि त्याला कॅप्शन दिले की, ‘हाहाहाहाहाहा धीस फ्रॉम टीम ए दिल हैं मुश्किल’. वेल, अनुष्का तर भारीच खुश आहे.